प्रदर्शनाची तारीखः ८ एप्रिल २०२१

प्रदर्शनाचं माध्यमः डिस्ने प्लस हॉटस्टार

political parties in uttar pradesh hail sc judgement on bulldozer action
‘बुलडोझर दहशत’, ‘जंगल राज’ संपेल! निकालाचे विरोधी पक्षांकडून स्वागत; सरकारची सावध प्रतिक्रिया
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
bull Fight Viral Video | Bull Attack on boy Wearing Red Shirt
“शिंगांनी उडवलं अन् लाथांनी तुडवणार इतक्यात…”, पिसाळलेल्या बैलाचा व्यक्तीवर हल्ला; पाहा थरारक Video
Lack of measures for conservation protection of golden fox Mumbai print news
सोनेरी कोल्ह्याच्या संवर्धन, संरक्षणासाठी ठोस उपाययोजनांचा अभाव
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Bigg Boss 18 ekta Kapoor slams on Vivian dsena watch promo
Bigg Boss 18: एकता कपूरने ‘बिग बॉस’च्या लाडक्या विवियन डिसेनाला चांगलंच झापलं, म्हणाली, “तुला लाँच केल्यानंतर मी…”
Hyena herd tried to attack the lion
‘संकटात सगळ्यांचे नशीब साथ देत नाही…’ तरसाच्या कळपाने केला सिंहावर हल्ला करण्याचा प्रयत्न… पुढे जे घडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप
Suraj Chavan
“बघा माझ्या लेकाने काय केलंय…”, हातात बिग बॉसची ट्रॉफी बघून वडिलांची ‘अशी’ असती प्रतिक्रिया; सूरज चव्हाण म्हणाला…

दिग्दर्शकः कुकी गुलाटी

कलाकारः अभिषेक बच्चन, निकिता दत्ता, इलियाना डिक्रूझ, संजीव पांडे, श्रेष्ठा बॅनर्जी.

भारतातला प्रसिद्ध आणि बहुदा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा स्टॉक मार्केट घोटाळा कथन करणारा ‘बिग बुल’ हा चित्रपट. खरंतर हे या चित्रपटाचं दुर्दैव म्हणावं लागेल की, याच्या प्रदर्शनाआधीच ‘स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरीज प्रदर्शित झाली. जर तुम्ही ही वेबसीरीज पाहिली असेल, तर नकळत का होईना पण तुम्ही तशाच पद्धतीच्या सादरीकरणाची, संवादांची अपेक्षा ‘बिग बुल’कडूनही करता, पण ती पूर्ण होत नाही. त्यामुळे हा चित्रपट पाहायचा असेल तर सर्वात आधी ‘स्कॅम १९९२’ची प्रतिमा मनातून पूर्णपणे पुसली गेलेली असावी. तर कदाचित हा चित्रपट पसंत पडेल. पण ज्यांनी ‘स्कॅम १९९२’ पाहिली नाही, त्यांनासुद्धा हा चित्रपट आवडेल का याबद्दल शंकाच वाटते.

यामागे काही प्रमुख कारणे म्हणजे संवादातला किचकटपणा. अवजड विषय, तो मांडणारे बोजड संवाद आणि संवाद साधणारे बालिश कलाकार. स्टॉक मार्केट, शेअर्स, ब्रोकरेज, इंटरेस्ट रेट, कम्युनिस्ट असे अनेक बोजड शब्द पेलायला हे कलाकार फारच कमकुवत आहेत. इलियाना डिक्रूझ कोणत्याच बाजूने पत्रकार वाटत नाही. तिला केवळ पाठांतर करून जड जड संवाद म्हणायला उभं केल्यासारखं वाटत आहे. अभिषेक बच्चनचंही तेच. या विषयातलं त्याला कळत असेल असं त्याच्या एकूण व्यक्तिमत्वाकडे आणि पडद्यावरच्या वावरण्यावरून वाटत नाही. मुळातच अवघड असलेला हा विषय सोपा करून सांगण्यापेक्षा हा चित्रपट प्रेक्षकांचा गोंधळ अजूनच वाढवतो.

दुसरं कारण म्हणजे चित्रपटाचं संगीत. संवाद उठावदार होण्यात पार्श्वसंगीताचा महत्त्वाचा वाटा असतो. चित्रपटाचं पार्श्वसंगीत चांगलं आहे पण संवादांना पूरक नाही. पात्रांनाही ते तितकंसं शोभत नाही. भारतीय चित्रपटांना एक नको ती खोड आहे. ती म्हणजे उगाचच गाणी भरणं. प्रत्येक चित्रपटात गाणं असायलाच हवं का? या चित्रपटातही एक लव्ह साँग आहे पण त्याच्यामुळे विषयाच्या गांभीर्यालाच धक्का लागत आहे.

तिसरं प्रमुख कारण म्हणजे अभिनय. चित्रपटात अभिनयाला फक्त दोनच व्यक्तींना वाव होता तो म्हणजे अभिषेक आणि इलियानाला. पण दोघांनीही त्याचा फारसा फायदा घेतलेला दिसत नाही. हर्षद मेहतासारख्या महत्त्वकांक्षी आणि एवढा मोठा घोटाळा केलेल्या व्यक्तीची भूमिका साकारताना अंगी तो आत्मविश्वास, नजरेत, वागण्यात जो बेदरकारपणा असायला हवा, तो अगदी मोजक्या ठिकाणी दिसतो, पण भावत नाही. काही ठिकाणी अभिषेक फार आवडतो. म्हणजे शेवटचा पत्रकार परिषदेचा प्रसंग असेल, सुरुवातीचे काही प्रसंग असतील. पण एकूणातच चित्रपट पकड घेत नाही. चित्रपटाची सगळी सूत्रं मुख्य पात्राच्या हातात असतात. पण तेच ठाम नसेल, तर चित्रपटाचा म्हणावा तितका प्रभाव पडत नाही. असंच काहीसं या चित्रपटाच्या बाबतीत दिसतं.

हेमंत शाह म्हणजे मुख्य पात्राचा परिवार गुजराती आहे हे फक्त त्याच्या आईकडे म्हणजे सुप्रिया पाठककडे पाहिल्यावर, तिचं बोलणं ऐकल्यावर लक्षात येतं. बाकी कोणालाही तो गुजराती लहेजा पकडणं जमलेलं नाही. मधेमधे ओढून ताणून गुजराती टोनमध्ये बोलण्याच्या केलेल्या प्रयत्नाचं मात्र कौतुक करायलाच हवं. हेमंत शाहच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री निकिता दत्ता. खरंतर तिच्या ‘कबीर सिंग’मधल्या छोट्याशा भूमिकेतून तिने आपला ठसा उमटवण्याचा चांगला प्रयत्न केला होता. याही चित्रपटात फारसा काहीच रोल नसतानाही तिने आपल्या अभिनयाने समोर यायचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. पण अभिषेक बच्चनच्या स्टारडमने ती झाकून जाते. इलियाना आणि एका मुलीचा लोकलमधला संवाद अनावश्यक आणि अगदीच ओढून ताणून बसवलेला वाटतो.

थोडक्यात काय, या ‘बिग बुल’ची बुलककार्ट अनेक ठिकाणी धक्के खात आहे. अभिषेकचं ‘गुरु’मधलं काम पाहून जर या चित्रपटाकडे येत असाल, तर तुमच्या अपेक्षा काही प्रमाणात पूर्ण होतील. पण मुळातच अभिषेक बच्चन आवडत नसेल, तर हा चित्रपट बघण्यात काहीही पाँईट नाही. कारण, त्याच्याशिवाय चित्रपटात पाहण्यासारखं दुसरं विशेष काहीच नाही. अभिषेक बच्चन ही चित्रपटाची त्यातल्या त्यात बरी बाजू.