बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सातत्याने चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे रिया चक्रवर्ती. रिया ही नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंबंधित ड्रग्ज प्रकरणी अडकल्यानंतर रियाला अटक झाली होती. रिया चक्रवर्ती ही सध्या सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पुन्हा तिच्या कामांना सुरुवात केली आहे. सुशांतच्या निधनानंतर २ वर्षांनी रिया चक्रवती ही कामावर परतली आहे. याबाबतची एक पोस्ट तिने शेअर केली आहे.
रिया चक्रवर्तीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. रिया चक्रवर्तीने शेअर केलेल्या या व्हिडीओत ती हसत हसत स्क्रिप्टचे वाचन करत असल्याचे दिसत आहे. त्यासोबत ती काहीतरी रेकॉर्ड करताना पाहायला मिळत आहे. यात तिच्या आजूबाजूचे वातावरण पाहून ती कोणत्या तरी रेडिओ चॅनलच्या स्टुडिओत उभी असल्याचे दिसत आहे.
या व्हिडीओला कॅप्शन देताना म्हणाली, ‘काल मी दोन वर्षांनी कामावर परतले. कठीण काळात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्यांचे आभार. सूर्य नेहमी प्रकाश देतो. त्यामुळे कधीही हार मानू नका.’ दरम्यान रिया चक्रवर्तीच्या या पोस्टनंतर तिला अनेकांनी पाठिंबा दिला आहे.
रियाची खास मैत्रीण शिबानी दांडेकर हिने या पोस्टवर हो तुम्ही करू शकता अशी कमेंट केली आहे. तर राजकुमार राव याची पत्नी पत्रलेखापासून मालिनी अग्रवालपर्यंत सर्व सेलिब्रिटींनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान रियाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
फरहान अख्तर-शिबानी दांडेकर यांची लगीनघाई, अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण
दरम्यान बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचे निधन होऊन एक वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. त्याच्या निधनानंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण चर्चेत आलं होतं. यानंतर अनेक मोठमोठ्या कलाकारांची चौकशी करण्यात आली. सुशांत सिंह राजपूतसंबंधित ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीचे नावही समोर आले होते. याप्रकरणी १ महिन्यासाठी तिला तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागली होती. रिया गेल्यावर्षी ‘चेहरे’ चित्रपटात दिसली होती. यात अमिताभ बच्चन, क्रिस्टल डिसूझा आणि इमरान हाश्मी यांनी भूमिका केल्या होत्या.