बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांची धाकटी लेक आणि निर्माती रिया कपूरने लग्न केले आहे. रियाने बॉयफ्रेंड करण बूलाणीसोबत लग्न गाठ बांधली आहे. रियाने साध्या पद्धतीने लग्न केले. रिया आणि करण यांच्या लग्नात भारतीय संस्कृतीत महत्वाचे असणारे मेहेंदी आणि संगीतचे कार्यक्रम नाही झाले. करणने तर त्याच्या लग्नात वरात देखील आणली नव्हती. या दोघांनी लग्नाच्या भारतीय रुढी परंपरा मोडल्या आहेत. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

हे सगळे व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत रिया आणि करण गाडीतून जाताना दिसत आहेत. रियाने लाला रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर करणने कुर्ता परिधान केला आहे. त्यानंतर एका व्हिडीओत अनिल कपूर हे सगळ्या फोटोग्राफर्सला मिठाई देताना दिसत आहेत. या व्हिडीओत त्यांनी निळ्या रंगाचा कुर्ता आणि धोती परिधान केली आहे. त्यानंतर एका व्हिडीओत सोनम आणि आनंद देखील दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा : याला म्हणतात खरं प्रेम! विक्रम बत्रा यांची प्रेयसी आजही आहे अविवाहीत

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा : ‘माधुरी दीक्षित दे, आम्ही लगेच इथून निघून जाऊ’, पाकिस्तानच्या मागणीला कॅप्टन विक्रम बत्रांनी दिले होते ‘असे’ उत्तर

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रिया आणि करण एकमेकांना गेल्या ११ वर्षांपासून ओळखत आहेत. आधी मैत्री आणि मग प्रेम अशी काही त्यांची लव्हस्टोरी आहे. शनिवार रात्री रिया आणि करणचे लग्न झाले. अर्जुन कपूर, बोनी कपूर, मसाबा गुप्ता, अंशुला कपूर, खुशी कपूर, शनाया कपूर, संदीप मारवाह, संजय कपूर, महेप कपूर आणि जहान कपूर यांच्यासह अनेकांनी लग्नाला हजेरी लावली.