रिचा चड्डाने जणू चित्रपट नकारण्याचा सपाटाच लावला आहे. ‘रागिनी एमएमएस २’ आणि ‘टीना अॅण्ड लोलो’मध्ये काम करण्यास नकार दिल्यानंतर तिने आता ‘मस्तीजादे’साठी नकारघंटा वाजवली. सनी लिओनीसोबतचा हा तिसरा चित्रपट आहे जो तिने नाकारला. ‘मस्तीजादे’ हा मिलाप झवेरीचा सेक्स कॉमेडीपट आहे.
मला आणि माझ्या टीमला असं वाटतं की मी कोणत्याही सेक्स कॉमेडीपटात काम करू नये. मला सनीविषयी आदर आहे. हा तिसरा चित्रपट आहे ज्यात मी काम करण्यास नकार दिला. मात्र, मी नाकारलेले चित्रपटात सनी लिओनी असणे हा निव्वळ एक योगायोग आहे, असे रिचा चड्डाने व्यक्त केले. ‘ओय लक्की, लक्की ओय’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटाद्वारे समीक्षकांचीही प्रशंसा मिळवणा-या रिचाचे येत्या दिवसांत पाच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Richa chadda refuses sex comedy mastizaade with sunny leone her third refusal in a row