‘गँग ऑफ वासेपूर’ आणि अन्य चित्रपटातील उत्कृष्ट अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री रिचा चढ्ढा ‘कॅब्रे’ या पूजा भटच्या आगामी चित्रपटात दिसेल. चित्रपटातील दृश्ये मोबाईल फोनद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचू नयेत म्हणून रिचाने चित्रपटाच्या सेटवर मोबाईल फोन बाळगण्यास सर्वांना मनाई केली आहे. अत्यंत परिश्रमपूर्वक साकारत असलेल्या या भूमिकेबाबतची प्रेक्षकांमधील उत्सुकता चित्रपटाचा आनंद घेण्यापर्यंत जागृत राहावी, अशी तिची इच्छा आहे. हा चित्रपट पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर कथेतील अनेक आश्चर्यकारक चढ-उतार अनुभवायला मिळणार असल्याचे समजते. ‘कॅब्रे’ चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला असला तरी चित्रपटात तिचे अन्य बरेच लूक असून त्याबाबत गुप्तता बाळगण्यात येत आहे. म्हणूनच रिचाने चित्रपटाच्या सेटवर मोबाईल फोनला बंदी घातली असल्याचे समजते.
‘कॅब्रे’च्या सेटवर रिचाकडून सेलफोनवर बंदी
चित्रपटात रिचाचे बरेच लूक असून त्याबाबत गुप्तता बाळगण्यात येत आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 11-05-2016 at 13:43 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Richa chadha bans use of cell phones on cabaret sets