गेले काही दिवस चर्चा होती ती कान चित्रपट महोत्सवाची. लॉरियलच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आणि बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय, सोनम कपूर आणि कतरिना कैफ या तिघींनी कान महोत्सवाला उपस्थिती लावली होती. वेगवेगळ्या डिझायनर गाउनमध्ये या अभिनेत्रींनी कानमध्ये आपली जादू चालवली. मात्र, या महोत्सवात खास लक्षवेधक ठरलेली तरीही माध्यमांकडून वगळलेली अभिनेत्री म्हणजे रिचा शर्मा.
richa-sharma450
कान महोत्सवात बहुतेक सर्वच अभिनेत्री या गाउनमध्ये दिसतात. पण रिचा या महोत्सवात भारतीय पेहरावात दिसली. तिच्या ‘मसान’ या चित्रपटाचे कान महोत्सवात स्क्रिनिंग करण्यात आले. यावेळी ती चक्क साडी नेसून गेली होती. सब्यासाचीने डिझाइन केलेली फ्लोरल साडी तिने परिधान केली होती. अतिशय साधा आणि साजेसा असा मेकअप, हातात सोनेरी क्लच, डोक्यावर टिकली यामुळे रिचाचे सौंदर्य अधिक खुलून आले होते.

Story img Loader