हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते रिचर्ड गेर वयाच्या ६९व्या वर्षी बाबा झाले आहेत. त्यांची तीसरी पत्नी अलजेन्ड्रा सिल्व्हा हीने आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. रिचर्ड यांचे हे तिसरे अपत्य असून याआधी त्यांना दोन पत्नींपासून दोन मुले आहेत.

२००७ साली जयपूरमधील एका कार्यक्रमात रिचर्ड गेर यांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता. हे दृष्य पाहून अनेकांनी रिचर्डवर जोरदार टीका केली होती. परंतु शिल्पा शेट्टीने याबाबत कोणतीही प्रतिक्रीया दिली नव्हती. शिल्पा व रिचर्ड या दोघांविरोधात एका सामाजिक संस्थेने अश्लिलतेचा प्रचार केल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांनी याबाबात पोलिस तक्रार देखिल केली होती. मात्र कोर्टाने केवळ हा एक पब्लिसिटी स्टंट आहे असे असे सांगून याचिका फेटाळून लावली होती.

ऑस्कर व गोल्डन ग्लोब पुरस्कारांवर नाव कोरणारे रिचर्ड गेर हे १९८० -९०च्या दशकात हॉलिवूड सिनेसृष्टीतील सुपरस्टार होते. त्यांच्या प्रीटी वुमन, प्राइमल फियर, अमेरिकन जिगोलो, शॅल वी डान्स या चित्रपटांनी तुफान यश मिळवले होते. काळानुरुप त्याला आपल्या अभिनयामध्ये बदल करणे शक्य झाले नाही. परिणामी ताज्या दमाच्या अभिनेत्यांपुढे प्रेक्षकांमधील लोकप्रियता ढासळली. त्यामुळे रिचर्डचे चित्रपट गर्दी खेचण्यात अपयशी ठरले.

अलजेन्ड्रा सिल्व्हा ही रिचर्ड गेर यांची तीसरी पत्नी आहे. याआधी त्यांनी अभिनेत्री सिंडी क्रॉफर्ड व केरी लॉवेल या दोघींशी लग्न केले होते. २०१५ साली त्यांनी आपली दुसरी पत्नी सिंडी क्रॉफर्डला घटस्फोट दिला. त्यानंतर ते ३५ वर्षीय अभिनेत्री अलजेन्ड्रा सिल्व्हाला डेट करु लागले. गेल्याच वर्षी दोघांनी लग्न केले.

Story img Loader