बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. शिल्पा शेट्टीला रिचर्ड गिअरने किस केलं होतं. त्यासंदर्भातला व्हिडीओ व्हायरल झाला होता. २००७ मधला हा कार्यक्रम होता. या प्रकरणात कोर्टाने शिल्पा शेट्टीला इतक्या वर्षांनी दिलासा दिला आहे. न्यायाधीश एस. सी. जाधव यांनी सांगितलं की शिल्पा शेट्टीच्या विरोधात अश्लीलता पसरवण्याचा कुठलाही पुरावा नाही. तसंच शिल्पा या प्रकरणात भागीदार नव्हती कारण रिचर्डने तिला किस केलं, रिचर्डला तिने किस केलं नव्हतं असंही न्यायाधीशांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२००७ मध्ये नेमकं काय घडलं होतं?

२००७ मध्ये राजस्थानमधल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात शिल्पा शेट्टीला रिचर्ड गिअरने भर कार्यक्रमात किस केलं होतं. तो तिचं चुंबन घेण्याचं थांबलाच नव्हता. या प्रकरणामुळे शिल्पा शेट्टी वादात अडकली होती. अश्लीलता आणि असभ्यतेचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता. आता या प्रकरणी बॉम्बे हायकोर्टाने तिला दिलासा दिला आणि तिला दोषमुक्त केलं आहे. त्यामुळे तिला दिलासा मिळाला आहे.

जानेवारी २०२२ महिन्यात महानगर दंडाधिकारी केतकी चव्हाण यांचा निष्कर्ष काय?

या प्रकरणी जी तक्रार शिल्पा शेट्टीच्या विरोधात करण्यात आली होती त्याचा सखोल अभ्यास केल्यानंतर महानगर दंडाधिकारी केतकी चव्हाण यांनी हा निष्कर्ष काढला की या प्रकरणात आरोपी क्रमांक एक म्हणजेच रिचर्ड गिअरच्या कृत्य शिल्पा शेट्टीला सक्तीने सहन करावं लागलं. पोलीस अहवाल आणि सादर करण्यात आलेली सगळी कागदपत्रं विचारात घेऊन त्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिला या गुन्ह्यातून मुक्त केलं.

काय आहे हे प्रकरण?

२००७ मध्ये एड्स जनजागृती संदर्भातला एक कार्यक्रम राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रिचर्ड गिअर आणि शिल्पा शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात शिल्पा शेट्टी बोलत होती. रिचर्ड गिअरला तिने जेव्हा स्टेजवर बोलावलं तेव्हा तो आला. त्यानंतर आधी त्याने तिच्या हाताचं चुंबन घेतलं. त्यानंतर तिला वारंवार मिठी मारून गालावर किस करत राहिला. या घटनेमुळे शिल्पा शेट्टी चांगलीच ओशाळली होती.

तिने हसत वेळ मारून नेली मात्र घडलेला प्रकार तिच्यासाठीही अनपेक्षित होता. त्यानंतर या संदर्भातल्या वादाला तोंड फुटलं. शिल्पा शेट्टीने अश्लीलता आणि असभ्यता पसरवल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. राजस्थानच्या एका कोर्टाने या दोघांविरोधात अटक वॉरंटही काढला होता. मात्र नंतर हे प्रकरण मिटवण्यात आलं होतं. त्यामुळे या दोघांना अटक झाली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Richard gere kissing case mumbai court discharges shilpa shetty upholds previous judgment clearing her of obscenity charges scj