‘बिग बॉस ओटीटी’ या शोमुळे अभिनेता राकेश बापट चांगलाच चर्चेत आला आहे. राकेश बापट आणि त्याची पत्नी रिद्धी डोगरा यांचा घटस्फोट झाला असला तरी रिद्धी कायम राकेशला सपोर्ट करताना दिसते. तसचं राकेशच्या विरोधात बोलणाऱ्यांना देखील रिद्धी सडेतोड उत्तर देत आहे. नुकतच कश्मिरा शाहने राकेशला ‘जोरू का गुलाम’ म्हंटलं होतं. यावर रिद्धीने कश्मिराला चांगलंच सुनावलं आहे.
नुकतीच अभिनेत्री रश्मी देसाई आणि देवोलिनाने ‘बिग बॉस ओटीटी’च्या स्पर्धकांची भेट घेतली. यावेळी शमिताने तिला राकेश बापट आवडतं असल्याचं पुन्हा एकदा कबुल केलं. नुकत्याच झालेल्या एका टास्कमध्ये राकेशने केवळ शमिताचं मन राखण्यासाठी प्रत्येक प्रश्नावर दिव्याचं तोंड पाण्यात बुडवलं. यावर राकेशने शमिताला घाबरुन असं केल्याच्या चर्चा सुरु झाल्या. यानंतर कश्मीरा शाहने ट्वीटरवर एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. यात ती म्हणाली, “अभिनंदन राकेश पुन्हा एकदा तू जोरू का गुलाम बनण्याच्या मार्गावर आहेस”
हे देखील वाचा: प्रसिद्ध गायकाला डेट करत असल्याच्या चर्चांवर अखेर आर्या आंबेकरने सोडलं मौन, म्हणाली…
Congratulations @RaQesh19 you are on your way to becoming a hen pecked husband…again. @BiggBoss @biggbossott_ @ColorsTV @karanjohar pic.twitter.com/T8Je5eECDK
— kashmera shah (@kashmerashah) September 14, 2021
या पोस्टमध्ये रिद्धीचं नाव घेतलं नसलं तरी कश्मीराचा रोख रिद्धीवर असल्याचं लक्षात येतंय आणि म्हणूनच रिद्धीने कश्मीराच्या पोस्टला उत्तर दिलंय. एका ट्वीटमध्ये ती म्हणाली, “पुन्हा एकदा? एक्सक्यूज मी. कृपा करून अशी वाईट कमेंट करू नको. शांती राख”
Again!? Excuse me.
Kindly don’t make loose comments. Peace out.— Ridhi Dogra (@iRidhiDogra) September 14, 2021
तर रिद्धीच्या या कमेंटवर कश्मीराने पुन्हा एकदा पलटवार केला आहे. आणखी एक ट्वीट करत कश्मीरा म्हणाली, “बरं मग रिद्धी डोगरा, पहिल्यांदा जोरू का गुलाम होण्याच्या मार्गावर. शाती राख एक्स वाईफ”
Ok then @ridhidogra on his way to becoming a hen pecked husband for the first time @RaQesh19 peace out ex wife @BiggBoss @biggbossott_ @ColorsTV
— kashmera shah (@kashmerashah) September 15, 2021
२०११ सालामध्ये राकेश आणि रिद्धी डोगरा विवाहबंधनात अडकले होते. तर २०१९ सालामध्ये त्यांचा घटस्फोट झाला.