भारतात सध्या आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाची खूप चर्चा आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात तिने जबरदस्त परफॉर्मन्स दिला. या सोहळ्यातील फोटो व व्हिडीओंची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. या सोहळ्यात परफॉर्म करताना रिहानाबरोबर नको ते घडलं. तिचा एक फोटो व्हायरल होत आहे.

जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग बॅशमध्ये रिहानाचा ड्रेस बाहीजवळून उसवला होता. तिने या सोहळ्यासाठी छान बॉडीकॉन शिमरी गाऊन घातला होता. तिने नेकलेस व कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला होता. तसेच डोक्यावर गुलाबी स्कार्फ घेतला होता. व्हायरल फोटोमध्ये ती नीता अंबानीबरोबर दिसतेय, त्यात तिच्या ड्रेसची शिलाई उसवल्याचं दिसतंय.

Video: …अन् रिहानाने विमानतळावर महिला पोलिसांना मारली मिठी, व्हिडीओ पाहून नेटकरी करतायत कौतुक

rihanna dress oops moment
रिहानाचा व्हायरल होणारा फोटो (सौजन्य – सोशल मीडिया)

कार्यक्रमात तिने ‘डायमंड्स’, ‘रुड बॉय’, ‘पोअर इट अप’ आणि इतर गाणी गायली. तिची सुपरहिट गाणी गात तिने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. गुजरातच्या जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा तीन दिवसीय प्री-वेडिंग सोहळा सुरू आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या सेलिब्रेशनमध्ये गायिका रिहाना, मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग, त्यांची पत्नी, शाहरुख खान व कुटुंबीय, बिल गेट्स यांच्यासह जवळपास एक हजार पाहुण्यांची हजेरी लावली आहे.

Story img Loader