आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहाना भारत दौऱ्यावर होती. तिने अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात जबरदस्त परफॉर्मन्स सादर केला. तिच्या गाण्यांवर अंबानी कुटुंबियांसह उपस्थित पाहुण्यांनाही डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही. आपल्या अप्रतिम सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकणारी रिहाना आज सकाळी माघारी गेली, यावेळी तिच्या विमानतळावरील कृतीने लक्ष वेधून घेतलं आहे.

जामनगर विमानतळावरील रिहानाचे खूप व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यात तिने चाहत्यांबरोबर फोटो काढले त्या व महिला पोलिसांबरोबरच्या तिच्या व्हिडीओंचा समावेश आहे. एका व्हिडीओमध्ये रिहाना तिच्या सुरक्षेसाठी तैनात महिला पोलिसांना मिठी मारताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. रिहानाच्या या कृतीचं नेटकरी खूप कौतुक करत आहेत.

Video: अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगमध्ये नीता व मुकेश अंबानींचा रोमँटिक डान्स, ‘या’ गाण्यावर धरला ठेका

‘इतकं स्टारडम असूनही रिहाना किती नम्र आहे,’ ‘जया बच्चन व काजोल यांनी रिहानाकडून काहितरी शिकायला हवं,’ इतकी मोठी आर्टिस्ट असूनही ती पोलिसांशी ज्या नम्रतेने वागली, त्याचं कौतुक करायला हवं, असं लोक व्हिडीओवर कमेंट करून म्हणत आहेत.

Rihanna Video Comments
रिहानाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट)

दरम्यान, अनंत अंबानी व राधिका यांचा प्री वेडिंग सोहळा जामनगरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवसांच्या या सोहळ्यात जगभरातील अनेक कलाकारांना व खेळाडूंना निमंत्रित करण्यात आलंय. अगदी मार्क झुकरबर्ग व बिल गेट्सही या सोहळ्यासाठी भारतात आले आहेत.

Story img Loader