‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. या चर्चेमागचं कारण म्हणजे सोशल मीडियावर तिने पोस्ट केलेले फोटो. रिंकूने पहिल्यांदाच हॉट अंदाजातील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. नेटकरी तिच्या या अदांवर फिदा झाले असून त्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लॉकडाउनमध्ये घरीच असलेली रिंकू सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात आहे. विविध फोटो, व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. नुकताच तिचे क्रॉप-टॉपमध्ये स्वत:चा ‘ब्लॅक अँड व्हाइट’ फोटो पोस्ट केला. ‘प्रयत्न सोडू नका, सुरुवात ही नेहमी कठीणच असते, सुरक्षित राहा, फिट राहा’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

रिंकूने नुकतंच वेब विश्वात पदार्पण केलं असून ‘हंड्रेड’ ही तिची पहिली वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजमधील रिंकूच्या अभिनयाचंही कौतुक होतंय. इतकंच नव्हे तर ती लवकरच बॉलिवूडमध्येही पदार्पण करणार आहे. रिंकूच्या पहिल्या चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटातूनच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सध्या लॉकडाउनमध्ये रिंकू घरी आईला कामात मदत करतेय, स्वयंपाक करतेय, चित्र काढतेय, वेब सीरिज बघतेय. “सर्वांनाच ब्रेक हवा होता, पण तो असा ब्रेक अपेक्षित नव्हता”, असं तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्याचसोबत चाहत्यांना तिने घरीच सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rinku rajguru first time shared her hot photo on social media ssv
Show comments