दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी ‘आर्ची’ म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरुला ओळखले जाते. रिंकू ही उत्तम अभिनयसोबतच तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते. ती कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. विशेष म्हणजे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. रिंकूच्या आई वडिलांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त तिने खास शब्दात आई वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.
नुकतंच रिंकूने तिच्या आई-वडिलांचा एक छान फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हा फोटो शेअर करत तिने खास पोस्टही लिहिली आहे. रिंकूने हा फोटो शेअर करत ‘जगातील सर्वोत्तम पालकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा’, असे लिहिले आहे.
त्यासोबत तिने तिच्या लहानपणी आई-वडिलांसोबत काढलेला एक फोटोही शेअर केला आहे. यात ती तिच्या आई-वडिलांच्या मध्ये बसलेली दिसत आहे. त्यासोबत तिने लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Wikipedia वरील स्वत:चा ‘तो’ उल्लेख पाहून संतापली तनुश्री दत्ता; म्हणाली “माझं…”
रिंकूचा काही दिवसांपूर्वी ‘२०० हल्ला हो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दलित महिलांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य करण्यात आले आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरुसोबत अमोल पालेकर आणि बरुण सोबती मुख्य भूमिकेत झळकले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सार्थक दासगुप्ता यांनी केले आहे.