‘कांतारा’चा दिग्दर्शक व अभिनेता ऋषभ शेट्टीने आपण कधीच रश्मिका मंदानावर टीका केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या IFFI च्या पत्रकार परिषदेत त्याने सर्व अफवांना पूर्णविराम दिला. एक हिट चित्रपट दिल्यानंतर मला कन्नड फिल्म इंडस्ट्री सोडायची नव्हती, असं विधान आपण केलं होतं, ते कोणावरही टीका करण्यसाठी नव्हतं असं रिषभने म्हटलं आहे.

‘५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’मध्ये ‘कांतारा’साठी रिषभ शेट्टीला विशेष ज्यूरी पुरस्कार देण्यात आला. ‘इफ्फी’च्या पत्रकार परिषदेत बोलताना ऋषभ म्हणाला, “‘कांतारा’ला इतकं मोठं यश मिळवून देण्याचं श्रेय मला कन्नड प्रेक्षकांना द्यायचं आहे. त्यांच्यामुळेच या चित्रपटाबद्दल इतर लोकांना माहीत झालं. हा चित्रपट इतर राज्यांमध्ये पोहोचला. मी कन्नड प्रेक्षकांचा नेहमीच ऋणी आणि आभारी आहे. त्यामुळे मला फक्त एक हिट दिल्यानंतर इंडस्ट्री सोडणारी व्यक्ती बनायचे नाही.”

“पुरुषांना महिन्यातून सात दिवस…”, नीना गुप्ता यांच्या ‘फालतू फेमिनिझम’ विधानावर कंगना रणौतची प्रतिक्रिया

अशातच एका युजरने एक्सवर पोस्ट केली आणि लिहिलं की मी रिषभ शेट्टीची मनापासून माफी मागतो, त्याने हेच म्हटलं होतं. त्याचा अर्थ असा होता की त्याला एक हिट चित्रपट दिल्यानंतर कन्नड इंडस्ट्री सोडायची नाही. रिषभ शेट्टीने पोस्टला उत्तर दिलं आणि “काही हरकत नाही, शेवटी मला काय म्हणायचं आहे ते कोणाला तरी समजलं,” असं तो म्हणाला.

“मी नेहमी चुकीच्या लोकांना डेट केलंय”, नीना गुप्ता यांचं वक्तव्य; म्हणाल्या, “खूप फालतू अन् वाईट…”

दरम्यान, रश्मिकाने तिच्या करिअरची सुरुवात कन्नड चित्रपटाने केली होती आणि आता ती इतर भाषेतील चित्रपटांमध्ये अभिनय करत आहे. त्यामुळे काही काळापूर्वी जेव्हा आपल्याला इतरांप्रमाणे कन्नड इंडस्ट्री सोडायची नाही असं विधान रिषभने केलं होतं तेव्हा त्याने रश्मिका मंदानाला टोला लगावला होता, असं म्हटलं गेलं. पण अखेर त्याने त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

Story img Loader