रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ या कन्नड चित्रपट चांगलाच गाजला होता. २०२२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. कांताराला मिळालेल्या यशानंतर चाहते चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वीच रिषभ शेट्टीने कांतारा चित्रपटाचा सिक्वेल ‘कांतरा चॅप्टर १’ ची घोषणा केली. या घोषणेनंतर नुकताच या चित्रपटाचा फस्ट लूक टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.
हेही वाचा- “आमच्या पिढीला सेक्सची…” मुलाखतीदरम्यान नीना गुप्ता स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, “पतीला खुश…”
‘कांतरा चॅप्टर १’ चा फर्स्ट लूक टीझर तिथूनच सुरु होतो जिथे ‘कांतारा’ चित्रपटाचा शेवट दाखवण्यात आला होता टीझरमध्ये रिषभ शेट्टीचा जबरदस्त लूक बघायला मिळत आहे. हातात त्रिशूल आणि रक्ताने माखलेलं रिषभ शेट्टीचा लूक बघून धडकी भरायला होतं. केवळ २४ तासात या टीझरला १२ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. या टीझरमुळे प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबाबतची उत्सुक्ता आणखी वाढली आहे.
कांतारा चॅप्टर १ बाबात बोलायचं झालं तर हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित करण्यात येणार आहे. कन्नडबरोबर हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम, इंग्रजी आणि बंगाली भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. अद्याप या चित्रपटाच्या स्टारकास्टबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.