क्रिकेटर ऋषभ पंत याच्या अपघातानंतर आता हळूहळू त्याच्या प्रकृतीमध्ये सुधार होत आहे. देहरादून येथील रुग्णालयात ऋषभवर उपचार सुरु आहेत. आयसीयू वॉर्डमधून आता त्याला जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे. एकाबाजूला अपघात झाल्यानंतर देशभरातून ऋषभच्या तब्येतीसाठी प्रार्थना केली जात आहे. दुसरीकडे मनोरंजन विश्वातून व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांवर नेटीझन्स मात्र मजा घेत आहेत. नुकतेच अभिनेत्री उर्वशी रौतेलाची आई मीरा रौतेला यांनी ऋषभची काळजी व्यक्त करणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकली. त्यानंतर या पोस्टखाली अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.
अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्या संबंधावर इंटरनेटवर नेहमीच खमंग चर्चा रंगत असते. त्यात हे दोघेही एकमेकांना उद्देशून कधी कधी इन्स्टाग्राम पोस्ट करत असतात, त्यामुळे नेटीझन्स युजरना गॉसिपसाठी आणखीन खाद्य मिळत असते. ऋषभचा अपघात झाल्यापासून सर्वचजण उर्वशी रौतेला काय पोस्ट करते, काय बोलते? याकडे लक्ष ठेवून होते. पण यात भाव खावून गेल्या आहेत मीरा रौतेला. उर्वशी रौतेला यांच्या आई मीरा यांची एक इन्स्टा पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
हे ही वाचा >> “तिथे ऋषभची प्रकृती गंभीर आहे आणि तू…” सेलिब्रेशनचा व्हिडीओ पोस्ट केल्याने उर्वशी रौतेलावर नेटकरी नाराज
ऋषभचा अपघात झाल्यानंतर मीरा रौतेला यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “सोशल मीडियावरची अफवा एका बाजूला आणि तुझी तब्येत एका बाजूला. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तराखंडचे नाव प्रकाशमान करणे दुसऱ्या बाजूला. सिद्धबलिबाबा तुझ्यावर विशेष कृपा करो. तुम्ही सर्व देखील प्रार्थना करा.” या पोस्टनंतर युजर्सनी ऋषभ पंत याच्या तब्येतीसाठी प्रार्थना केली आहे. तर काही युजर्सनी दोघांची गमंत केली आहे. “सासूबाईची प्रार्थना नेहमीच कामाला येते”, तर एकाने लिहिले आहे की, “जावईबापू लवकरच बरे होतील, तुम्ही टेन्शन घेऊ नका”, तर एकाने लिहिले की, “मुलगी तर मुलगी आता आई पण”
हे ही वाचा >> चाहत्यांच्या गर्दीमुळे ऋषभला विश्रांतीही मिळत नाही; पंतच्या कुटुंबीयांची तक्रार
उर्वशी रौतेला झाली होती ट्रोल
उर्वशी रौतेलानेही दोन दिवसांपूर्वी एक पोस्ट टाकली होती. या पोस्टवर एका यूजरने लिहिले की, “येथे ऋषभचा अपघात झाला आहे आणि तुला ड्रेस अप करावे लागेल.” त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘भाई हॉस्पिटलमध्ये आहे आणि तुम्ही इथे फोटो पोस्ट करत आहात.” आणखी एक जण म्हणाला, “वहिनी लाज वाटते. ऋषभ भाऊ रुग्णालयात आहेत आणि तुम्ही हॉट फोटो पोस्ट करत आहात. एकाने लिहिले, “कोण पांढऱ्या पोशाखात प्रार्थना करते.” तिसऱ्या यूजरने लिहिले की, “अपघाताच्या वेळी अशी पोस्ट टाकणे तुम्हाला शोभत नाही.”