बहुचर्चित हनुमानच्या सिक्वलचे पहिले पोस्टर निर्मात्यांनी नुकतेच सादर केलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता रिषभ शेट्टी ‘जय हनुमान’ या चित्रपटात हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा पहिला लूक आणि थीम साँग प्रदर्शित झालं आहे. दिवाळीच्या निमित्ताने मिथ्री मूव्हीजने प्रेक्षकांना दिलेली ही एक खास भेट आहे.

पोस्टरमध्ये रिषभ शेट्टीने लाल रंगाचा पोशाख परिधान केला आहे. यात तो साधूच्या वेशात दिसत आहे. मात्र, या साधूच्या रूपात लपलेली त्याची खरी ओळख त्याच्यामागे दिसणाऱ्या लांब शेपटामधून दिसून येते. पोस्टरमध्ये रिषभ शेट्टीने हातात प्रभू श्रीरामाची मूर्ती घेतली असून त्यात तो भावनिक झाल्याचं दिसतंय.

suriya move to mumbai with wife jyothika and children
‘हा’ साऊथ सुपरस्टार पत्नी अन् मुलांसह मुंबईत झाला स्थायिक; म्हणाला, “या शहरातील शांती आणि…”
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
billy zane going to play Marlon Brando role
‘टायटॅनिक’फेम अभिनेता बिली झेनचा नव्या सिनेमातील लूक पाहून चाहते झाले चकित; म्हणाले, “ऑस्कर नामांकन…”
Mrunal Thakur Comment on Diwali Edited Video
Mrunal Thakur Comment: “त्याचे प्रत्येक अभिनेत्रीबरोबर व्हिडीओ, माझं तर मन…”, चाहत्याचे एडिटेड व्हिडीओ पाहून मृणाल ठाकूरची खोचक टिप्पणी
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
south star was first Indian to charge 1 crore per film
अमिताभ बच्चन, शाहरुख-सलमान खान नव्हे तर ‘हा’ आहे एक कोटी मानधन घेणारा पहिला भारतीय अभिनेता

हेही वाचा…“माझ्या बायकोसारखंच…”, जिनिलीयाबरोबरचा मजेशीर व्हिडीओ शेअर करीत रितेश देशमुखने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

मिथ्री मूव्हीजने एक्स या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “वचनपालनं धर्मस्य मूलम्। त्रेतायुगातील वचन कलीयुगात पूर्ण होण्यासाठी बांधील आहे.” तसेच, “राष्ट्रीय पुरस्कार विजेता रिषभ शेट्टी आणि दिग्दर्शक यांच्यासह आम्ही निष्ठा, शौर्य आणि भक्तीचे महाकाव्य सादर करीत आहे. या दिवाळीला ‘जय हनुमान’ या पवित्र नावाचा जयघोष करूया.”

‘जय हनुमान’च पोस्टर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले आहे की, “या सिनेमात रिषभ शेट्टीची निवड खूप अनपेक्षित होती.” दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट करत लिहिले आहे की, “मला वाटले होते की या सिनेमात राणा दग्गुबतीची निवड होईल, पण रिषभ शेट्टीसुद्धा एक चांगली निवड आहे.” तर आणखी एका चाहत्याने कमेंट करत लिहिले, “रिषभ शेट्टी या सिनेमासाठी परफेक्ट चॉइस आहे.”

Fans commented on jai hanuman movie poster twitter
‘जय हनुमान’ सिनेमाच्या पोस्टरवर चाहत्यांनी कमेंट्स करत रिषभ शेट्टीच कौतुक केलं आहे. (Photo Credit – Mythri Movies x account)

हेही वाचा…‘द डर्टी पिक्चर’चा दुसरा भाग येणार का? विद्या बालनच मोठं विधान; म्हणाली, “मी पुन्हा…”

‘जय हनुमान’ हा एक सुपरहिरो अॅक्शन चित्रपट असून, प्रशांत वर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘हनुमान’च्या सिक्वलमध्ये कलीयुग दर्शवण्यात आले आहे, ज्यात प्रभू हनुमान आपल्या प्रभू रामांना दिलेल्या वचनानुसार अज्ञातवासात आहेत. जय हनुमान हा प्रशांत वर्मा यांच्या सिनेमॅटिक युनिव्हर्स (PVCU) चा एक भाग आहे. नवीने येरनेनी आणि वाय रवि शंकर यांनी या चित्रपटाची सह-निर्मिती केली आहे. या सिनेमाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

Story img Loader