गेल्या काही महिन्यांमध्ये बॉलिवूड चित्रपटांपेक्षा चर्चा आहे ती दाक्षिणात्य चित्रपटांची, एकामागोमाग एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे . सध्या चर्चा आहे ती रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ चित्रपटाची, ३० सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने १७० कोटीचा आकडा पार केला आहे. सगळ्याच स्तरातून या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनीही या चित्रपटाची दखल घेतली आहे.

कर्नाटकातील लोककथा, भूत कोला पारंपारिक नृत्यप्रकारावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला आता परदेशातून पसंती मिळत आहे. व्हिएतनाममधील कन्नड भाषिकांनी हो ची मिन्ह या शहरात येत्या १ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. कन्नड राजोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने या चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. स्क्रिनिंगचे ठिकाण प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट डी’एचेंजेस कल्चरल्स एव्हेक ला फ्रान्समध्ये करण्यात येणार आहे. या भाषिकांनी कांतारा च्या संपूर्ण टीमला त्यांच्या प्रदेशातील परंपरा आणि श्रद्धा यांच सार चित्रपटतात दाखवल्याबद्दल अभिनंदन केले आहे. व्हिएतनाममधील इंडियन बिझनेस चेंबरमधील मान्यवरांना, वाणिज्य दूतावासाला या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

ott new release Freedom at Midnight - SonyLIV Deadpool & Wolverine
या वीकेंडला ओटीटीवर पाहा थिएटरमध्ये गाजलेला ‘हा’ सिनेमा; सोबतीला आहे ऐतिहासिक वेब सीरिजसह थ्रिलरची मेजवानी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक

विश्लेषण : ज्या बॉलिवूडने दुर्लक्षित केले तिथल्याच चित्रपटांना मागे टाकणारा ‘कांतारा’ स्टार रिषभ शेट्टी आहे तरी कोण?

कर्नाटकमधल्या एका छोट्या गावातली गोष्ट ‘कांतारा’मध्ये दाखवण्यात आली आहे. स्वत:ला राजा म्हणवून घेणारा जमीनदार आणि गावामध्ये राहणारे गरीब, अशिक्षित शेतकरी यांच्यामधील संघर्ष या चित्रपटामध्ये पाहायला मिळतो. रिषभ व्यतिरिक्त सप्तमी गौडा, किशोर, अच्युत कुमार अशा कलाकारांनी या चित्रपटामध्ये काम केले आहे.

दिग्दर्शक अभिनेता अशा दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर पेलत रिषभ शेट्टीने ‘कांतारा’ सुपरहीट करून दाखवला आहे. या चित्रपटाची लोकप्रियता एवढी वाढली आहे की याचा दूसरा भागही काढावा अशी मागणी होताना दिसत आहे. रिषभ शेट्टी याने अजून तरी असा काही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.