बॉलिवूडमध्ये अष्टपैलू अभिनेते अशी ओळख असलेले ऋषी कपूर आता हयात नसले तरी ते त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. आपल्या चित्रपट कारकिर्दीत रोमँटिक हिरो ते खलनायक अशा विविधांगी भूमिका साकारणाऱ्या ऋषी कपूर यांचे जगभरात असंख्य चाहते आहेत. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो पाहिल्यानतंर तुम्हालाही वाटेल की हे तरुणपणीचे ऋषी कपूर आहेत.
हेही वाचा – ‘आदिपुरुष’ला स्पेशल ऑफरचाही फायदा नाहीच! सातव्या दिवसाची आकडेवारी पाहून बसेल धक्का
इन्स्टाग्रामवर ‘ऋषी कपूर रिटर्न्स’ या नावाचं एक अकाउंट आहे. या अकाउंटवरील सर्व व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला ते तरुणपणीचे ऋषी कपूर आहेत, असंच वाटेल पण तसं नाही. या व्हिडीओत दिसणाऱ्या तरुणाचं नाव नितांत सेठ आहे. तो हुबेहुब ऋषी कपूर यांच्यासारखा दिसतो. त्याने त्याचं इन्स्टाग्रामवरील नावही तसंच ठेवलंय. तो त्याच्या व्हिडीओमध्ये ऋषी कपूर यांच्या गाण्यांवर अभिनय करत असतो.
नितांतचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकरी त्यावर कमेंट्स करत आहेत. ‘तू हुबेहुब ऋषी कपूर यांच्यासारखा दिसतोस’, ‘मी तर व्हिडीओ पाहून घाबरलोच, मला वाटलं ऋषी कपूर परत आले’, ‘खूप छान हावभाव’, ‘काहींनी ऋषी कपूर जिवंत आहेत?’ तर काहींनी ‘आलिया भट्टचे सासरे अजून हयात आहेत,’ अशा प्रकारच्या कमेंट् केल्या आहेत.