ऋषी कपूर आणि त्याची पत्नी नीतू सिंग पहिल्यांदाच त्यांचा मुलगा रणबीर कपूरसोबत अभिनव कश्यपच्या ‘बेशरम’ चित्रपटात पडद्यावर दिसणार आहेत.
या चित्रपटामध्ये ऋषी कपूर आणि नीतू सिंग वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहेत.  ते दोघे पोलिसांच्या भूमिकेत रणबीर सोबत पडद्यावर वावरतील.
 “मुलगा व पत्नी सोबत चित्रपटात काम करायला मिळाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. त्यांच्यासोबत काम करताना खूप धमाल केली असून, आमच्या भूमिकांना या चित्रपटात योग्य न्याय मिळाला आहे. हा चित्रपट नाट्यमय असून दिग्दर्शकाने आम्हाला ब-याचवेळी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे.”, असे ऋषी कपूर म्हणाला.
ऋषी त्याचे भविष्यातले नियोजन सांगताना म्हणाला, “बेशरम हा फक्त प्रयोग होता, येत्या काळात रणबीर सोबत, माझ्या वडिलांच्या ‘आवारा’ चित्रपटाचा रिमेक करण्याचा माझा विचार आहे आणि त्याची निर्मिती आमच्याच आर. के. फिल्मसच्या बॅनर खाली करणार आहोत.”   
      

Story img Loader