अभिनेत्रींच्या मेकअप आणि टचअपसाठी लागणाऱया वेळेबाबतचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. पण, ‘कपूर अॅण्ड सन्स’ चित्रपटात ऋृषी कपूर यांचा मेकअप करण्यासाठी पाच तास तासांहून अधिक वेळ लागत आहे. खुद्द ऋृषी कपूर यांनीच याबद्दलची माहिती दिली आहे.
ऋृषी कपूर दिग्दर्शक शकून बत्राच्या आगामी ‘कपूर अॅण्ड सन्स’ चित्रपटात वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहेत. चित्रपटातील त्यांच्या लूकवर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि ऑस्कर पुरस्काराने सन्मानित झालेले मेकअप आर्टिस्ट ग्रेक कॅनम काम करत आहेत. ‘कपूर अॅण्ड सन्स’चे चित्रीकरण सुरू होण्याआधीपासूनच ऋृषी कपूर चित्रपटातील त्यांच्या लूकला घेऊन भरपूर उत्सुक होते. अखेर चित्रीकरण सुरू झाल्यानंतर सेटवर ‘मेकअप’ करतानाचे छायाचित्र ऋृषी कपूर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. शिवाय, मेकअपसाठी तब्बल पाच तासांहून अधिक वेळ लागत असल्याचेही कपूर यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
कपूर अॅण्ड सन्स हा चित्रपट पुढील वर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित होण्याचा अंदाज असून, करण जोहर या चित्रपटाचा निर्मात आहे, तर ऋृषी कपूर यांच्यासोबतच अभिनेत्री आलिया भट, अभिनेता फवाद खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा