बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलिया यांची जोडी लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत रितेश आणि जिनिलिया चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच रितेशने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितेशने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला रितेश दिसतो आणि बोलतो “माझं स्वत: वर प्रेम आहे, पण… आणि पुढे रितेश आणि जिनिलियाचा व्हिडीओ असून त्याच्या बॅकग्राऊंडला ‘I like me better’ हे गाणं प्ले होतं असल्याचे दिसते. हा व्हिडीओ शेअर करत “I love myself but….,” असे कॅप्शन रितेशने दिले आहे.

आणखी वाचा : “परत असं घोड्यावर बसायचं नाही”, अमोल कोल्हेंना मिळाली तंबी

आणखी वाचा : माझ्या हत्येचा कट रचला जातोय; सारेगमप विजेती वैशाली भैसनेची फेसबुक पोस्ट; म्हणाली “आज मला…”

रितेश आणि जिनेलियाने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. यंदाच्या वर्षी त्यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. जिनेलियाला खरी लोकप्रियता ही २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून मिळाली. जिनेलियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. मात्र, लग्नानंतर जिनेलियाने चित्रपटात काम केले नाही. त्यांना दोन मुलं असून रियान आणि राहिल अशी त्यांची नावं आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh and genelia deshmukh romantic video went viral dcp