बॉलिवूड स्टार सैफ अली खान, रितेश देशमुख आणि बिपाशा बसू त्यांच्या आगामी विनोदी चित्रपट ‘हमशकल्स’च्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहेत.
अभिनयापासून कारकिर्दीची वाटचाल सुरूकरून निर्माता बनलेला रितेश ‘हमशकल्स’मध्ये बंगाली ब्यूटी सोबत रोमान्स करताना दिसणार आहे. बिपाशा तिच्या ‘आत्मा’ या चित्रपटातून पडद्यावर शेवटी दिसली होती.
बिपाशा, रितेश दोघे साजिद खानच्या ‘हमशकल्स’च्या चित्रिककरणासाठी लंडन येथे गेले असून, बिपाशाने टिवटरवर तिच्या चाहत्यांशी संवाद साधला आहे. बिपाशाने टिवटमध्ये म्हटले आहे: “लंडनमध्ये नवा चित्रपट ‘हमशकल्स’च्या चित्रिकरणासाठी:) येथिल महिना आनंदात घालवायचाय! आजचे वातावरण खुपच छान:)”
बिपाशाने हमशकल्सच्या सेटवरून काही छायाचित्रे देखील टिवटरवर पोस्ट केली आहेत.

 

‘हमशकल्स’मध्ये सैफ अली खानची देखील भूमिका असून, दूरचित्रवाणी अभिनेता राम कपूर देखील महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या तिनही अभिनेत्यांच्या ‘हमशकल्स’मध्ये तिहेरी भूमिका आहेत.
रितेशने देखील टिवटरवर ‘हमशकल्स’च्या चित्रिकरणाची छायाचित्रे पोस्ट केली आहेत.

Story img Loader