बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्या दोघांचेही लाखो चाहते आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसतात. बऱ्याचवेळा त्यामुळे ते सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतात. रितेश त्याच्या ट्रोलर्सला कधी उत्तर देत नाही. मात्र, यावेळी एका टोलरने रितेशला त्याच्या पत्नीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिल्यामुळे रितेशने त्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

रितेशने पत्नी जिनिलियासोबत बॉलिवूड अभिनेता अरबाज खानच्या ‘पिंच २’ या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. त्याचा प्रोमो अरबाजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. शो दरम्यान, अरबाजने रितेशला सोशल मीडियावर कसे ट्रोल करतात हे सांगितले. एक ट्रोलर रितेशला म्हणाला, ‘तू तुझ्या पत्नीवर जास्त लक्ष ठेवले पाहिजे.’ यावर हसत रितेश म्हणाला, ‘मला पण वाटतं की तुम्ही तुमच्या पत्नीवर लक्ष द्या, माझ्या पत्नीवर नाही.’

आणखी वाचा : “तुझी रेखा मॉं…”, बच्चन घराण्याच्या सुनेला रेखा यांनी लिहिले होते ‘खास’ पत्र

दुसरीकडे एका नेटकऱ्याने जिनिलियाला तिच्या अभिनयावरून ट्रोल केले आहे. जिनिलिया ओव्हर अॅक्टिंग करते आणि ती एक चीप, निर्लज्ज आणि असभ्य काकू आहे. नेटकरी म्हणाला, ‘चीप, निर्लज्ज आणि असभ्य काकू जी सतत ओव्हरअॅक्टिंग करत असते.’ त्यावर सडेतोड उत्तर देत जिनिलिया म्हणाली, ‘मला असं वाटतंय की घरात त्याला चांगली वागणूक दिली जात नाही. भाऊ, आशा आहे की तुम्ही ठीक आहात.’

आणखी वाचा : ‘फॅमिली मॅन २’मध्ये समांथाची भूमिका पाहून शाहिदने व्यक्त केली ‘ही’ इच्छा

रितेश आणि जेनेलिया यांची पहिली भेट २००३ साली ‘मुझे तेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. दहा वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. त्या दोघांना दोन मुलं आहेत.

Story img Loader