बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलियाची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच जिनिलियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिनिलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जिनिलियाने गुलाबी तर रितेशने जांभळ्या रंगाचं टी-शर्ट परिधान केलं आहे. ते दोघं गुरुरंधावाच्या नाच मेरी राणी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला जिनिलिया आणि रितेश उत्साही होऊन नाचतात. काही सेकंदात नाच नाच नाच… हे संपत नाही आणि जिनिलिया दमते आणि रितेशला बंद करायला सांगते, पण रितेश थांबत नाही नंतर वैतागलेली जिनिलिया रितेशला मारते. हा व्हिडीओ शेअर करत “२० हा फक्त एक अंक आहे. रितेशची अनादी काळाकडे वाटचाल. हा सगळा वेडपणा आहे”, असे कॅप्शन जिनिलियाने दिले आहे. त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : मलायकाला मुलगा अरहान आई म्हणून नाही तर ‘या’ नावाने मारतो हाक

आणखी वाचा : “मी उघड्यावर शौचाला बसलो आणि मागे वळून पाहतो तर हॉलिवूडचे…”, करण जोहरने सांगितला ‘तो’ लाजिरवाणा किस्सा

रितेश आणि जिनेलियाने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. यंदाच्या वर्षी त्यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. जिनेलियाला खरी लोकप्रियता ही २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून मिळाली. जिनेलियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. मात्र, लग्नानंतर जिनेलियाने चित्रपटात काम केले नाही. त्यांना दोन मुलं असून रियान आणि राहिल अशी त्यांची नावं आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh genelia deshmukh dance video on naach naach naach went viral on social media dcp