छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दहा दिवसांपूर्वी म्हणजे १८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना भावला आहे. त्यामुळे सध्या तिकीटबारीवरही याची जोरदार कमाई सुरु आहे. या चित्रपटाचं कौतुक बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईबद्दल एक ट्विट केले आहे. यात त्यांनी मराठा योद्ध्यांची शौर्यगाथा असलेल्या ‘पावनखिंड’नं बॉक्स ऑफिसवरच्या कमाईबद्दल पोस्ट शेअर केली आहे. ते ट्वीट रिट्वीट करत रितेश म्हणाला, “हे अविश्वसनीय आहे!!! पावनखिंड टीमचे अभिनंदन! चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणाऱ्या मराठी प्रेक्षकांचे खूप खूप आभार”, असे ट्वीट रितेशने केले.

आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…

आणखी वाचा : “Arrange Marriage म्हणजे मटका, मी जर लग्न केल तर…”; प्राजक्ता माळीचे वक्तव्य चर्चेत

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, अंकित मोहन यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकरनं साकारली आहे. तर अजय पुरकर यांच्या अभिनयानं वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत जीव ओतला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh is all praise of pawankhind marathi movie dcp