बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. रितेश आणि जिनिलिया हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. रितेशने नुकताच हे एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
रितेशने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश पुस्तक वाचत असताना मागून आवाज येतो म्हणजे जिनिलिया पाठून बोलते की ती एका महिन्यासाठी तिच्या माहेरी जाते. यानंतर रितेशच्या आनंद हा शिगेला पोहोचतो. आनंदात रितेश डान्स करतो. तर व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘तेरी इसी अदा पर सनम मुझे प्यार आ गया’, हे गाणं प्ले होतं. हा व्हिडीओ शेअर करत ‘चलो डुएट करे’, असे कॅप्शन रितेशने दिले आहे.
आणखी वाचा : “पहिल्यांदा किस करताना मला…”, गिरिजा ओकने सांगितला कॉलेजमधला ‘तो’ विचित्र अनुभव
रितेश आणि जिनेलियाने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. यंदाच्या वर्षी त्यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. जिनेलियाला खरी लोकप्रियता ही २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून मिळाली. जिनेलियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. मात्र, लग्नानंतर जिनेलियाने चित्रपटात काम केले नाही. त्यांना दोन मुलं असून रियान आणि राहिल अशी त्यांची नावं आहेत.