चित्रपटात मी खलनायकाची भूमिका साकारावी अशी पत्नी जेनेलियाची इच्छा होती, असे ‘एक व्हिलन’ चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता रितेश देशमुखने म्हटले आहे. याविषयी बोलताना रितेश म्हणाला, खलनायकाची अथवा नकारात्मक प्रकारातली भूमिका मी साकारावी, असे जेनेलिया मला नेहमी सांगत असे. जेव्हा मला ‘एक व्हिलन’ चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली, तेव्हा हीच ती संधी असल्याचे मी ओळखले. त्यानंतर सर्वकाही जुळून आले… दिग्दर्शक मोहीत सुरीच्या ‘एक व्हिलन’ चित्रपटात श्रध्दा कपूर आणि सिध्दार्थ मल्होत्रा यांच्यादेखील भूमिका आहेत. ‘एक व्हिलन’ चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका साकारणारा रितेश आपल्या भूमिकेविषयी बोलताना म्हणाला, ही भूमिका साकारताना एक अभिनेता म्हणून मी कमालीचा उत्सुक होतो. ‘एक व्हिलन’ चित्रपटातील माझी भूमिका खूप वेगळी आहे. माझ्यासाठी हा एक चांगला अनुभव होता.

Story img Loader