बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलिया देशमुखची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांचे लाखो चाहते आहेत. ते दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतंच रितेशने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेशने अनेक वर्षांपूर्वीचे एक गुपित उघड केले आहे.

रितेश देशमुखने नुकतंच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश लग्नापूर्वीचे एक गुपित उघड करताना दिसत आहे. या व्हिडीओत तो म्हणतो की “आमचे नाते पक्के होणार होते, तेव्हाच तिने आतून हाक मारली आणि ती म्हणाली आई चहासाठी किती शिट्ट्या करायच्या?” यानंतर रितेशचे हे हावभाव पाहण्यासारखे असतात.

“जर आलिया भट्ट…, ‘रानबाजार’मधील बोल्ड सीनवर प्राजक्ता माळीच्या आईने दिली अशी प्रतिक्रिया

रितेशने शेअर केलेला हा व्हिडीओ मजेशीर स्वरुपातील आहे. त्याचा या व्हिडीओवर प्रचंड लाइक्स आणि कमेंट पाहायला मिळत आहे. यावर एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं की “भाऊ, माझ्यासोबतही असंच काहीसं घडलं आहे”. तर एक चाहता म्हणाला की, “मला हा व्हिडीओ पाहून हसण्यावर नियंत्रण ठेवता येत नाही.”

“ज्यांना शिव्या घालायच्यात त्यांना…”, ‘रानबाजार’च्या बोल्ड सीनवरील ट्रोलिंगवर तेजस्विनी पंडितचं स्पष्टीकरण

रितेश आणि जिनेलियाने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. यंदाच्या वर्षी त्यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. जिनेलियाला खरी लोकप्रियता ही २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून मिळाली. जिनेलियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. मात्र, लग्नानंतर जिनेलियाने चित्रपटात काम केले नाही. त्यांना दोन मुलं असून रियान आणि राहिल अशी त्यांची नावं आहेत.

Story img Loader