बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखचा लवकरच ‘बागी ३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रितेशसोबत अभिनेता टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर आणि अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या हे चारही कलाकार चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. या प्रमोशनच्या वेळी रितेशला दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाशी संबंधीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर रितेशने योग्य पटकथेची वाट पाहात आहे असे म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘माझ्या वडिलांचा सरपंच ते मुख्यमंत्री हा जीवनप्रवास थक्क करणारा होता. अनेक लोकांनी त्यांच्या जीवनावर कथा लिहिल्या आणि मला चित्रपटाची निर्मितीसाठी विचारले. पण ते इतके सोपे नाही’ असे रितेश म्हणाला.

आणखी वाचा : ‘लगान’मधील अभिनेत्याचा वयाच्या ७०व्या वर्षी होणार घटस्फोट?

‘जेव्हा एखादा विषय आपल्या हृदयाच्या अगदी जवळ असतो तेव्हा आपण इतर गोष्टींचा विचार करत नाही. जर मी त्यांच्या जीवनावर चित्रपट काढला तर लोक म्हणतील मी केवळ त्यांच्या जीवनातील चांगली बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला. जर दुसरं कोणी या चित्रपटाची निर्मिती केली तर ते असे नव्हते किंवा त्यांच्या बोलण्याची शैली अशी नव्हती असेही माझे मत होईल. त्यामुळे दोन्ही बाजूंचा विचार करुन बायोपिक काढणे तितके सोपे नाही’ असे रितेश पुढे म्हणाला.