बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखचा अभिनय आणि विनोद हे प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. गेल्या वर्षी लॉकडाउन दरम्यान, रितेशने टिक टॉक या अॅपवर पदार्पण केले होते. रितेशसोबत त्याची पत्नी जिनिलिया देशुमुख देखील त्या व्हिडीओमध्ये असायची. त्यांचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल व्हायचे. त्यांचे हे विनोदी व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचे जणू काही संपूर्ण टेन्शन निघून जात होतं. मात्र, काही काळानंतर टिक टॉक भारतात बंद करण्यात आलं आणि त्यावर रितेशने एक मजेशीर वक्तव्य केलं होतं.

रितेश म्हणाला होता की “टिक टॉक बंद झाल्यानंतर तो बेरोजगार झाला होता. परंतु, इन्स्टाग्रामवरील रील्स फीचर इंट्रोज्युझ झाल्यापासून त्याला पुन्हा काम मिळालं.” तर त्या कठीण काळात रितेश आणि जिनिलियाने सगळ्यांचे मनोरंजन केले.

आणखी वाचा : जात लपवण्यासाठीच वडिलांनी स्वीकारलं ‘बच्चन’आडनाव, अमिताभ यांचा खुलासा

‘मॅशबेल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत रितेश म्हणाला, “लॉकडाउन दरम्यान, सगळेच कठीण प्रसंगातून गेले. अशात आम्ही सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा विचार केला. म्हणून आम्ही टिक टॉक व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. परंतु, भारतात टिक टॉक बंद करण्यात आलं आणि असं वाटलं मी बेरोजगार झालो. असं वाटायचं की देवा आता काय करू मी. जे काम मी करायचो ते तर गेलं.”

आणखी वाचा : आई कुठे काय करते : अरुंधतीच्या आयुष्यात होणार ‘या’ खास व्यक्तीची एण्ट्री

रितेश पुढे म्हणाला, “काही दिवसांनंतर इन्स्टाग्रामवर रिल्स आले. मी म्हणालो चल रिल्स तयार करू.” दरम्यान, रितेश सगळ्यात शेवटी ‘बाघी ३’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात तो टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत दिसला होता.

Story img Loader