बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख मागच्या बऱ्याच काळापासून कोणत्याही चित्रपटात दिसलेला नाही मात्र सोशल मीडियावर तो बराच सक्रीय असतो. त्याचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आताही त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी धम्माल कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत. रितेशचा हा व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आहे.
रितेश देशमुख लवकरच ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच त्यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो एका ताटात खूप सारं जेवण घेऊन जेवताना दिसत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला ‘अजीब जानवर है, ये कितना भी खाए भूखा ही रहता है’ असा ऑडिओ देखील ऐकू येत आहे. एवढंच नाही तर या व्हिडीओमध्ये रितेशचं पोट वाढलेलं आणि त्यामुळे शर्टची बटणं उघडलेली दिसत आहेत.
आणखी वाचा- Video: करीना कपूरच्या कारखाली अडकला फोटोग्राफरचा पाय, अभिनेत्री चिडून म्हणाली…
रितेशनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, ‘जेव्हा तुमचा दिग्दर्शक आगामी चित्रपटासाठी वजन वाढवण्याचा सल्ला देतो. #MisterMummy’ असं कॅप्शन देखील दिसत आहे. यासोबतच व्हिडीओ शेअर करताना रितेशनं लिहिलं, ‘हे घ्या कॅलरी मील’ रितेशच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या धम्माल प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका युजरनं कमेंट करताना लिहिलं, ‘कितवा महिना सुरू आहे.’ तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘भावा काय अवस्था करून घेतली आहेस’ तर आणखी एकानं लिहिलं, ‘सर एवढं करण्यापेक्षा प्रोस्थेटिक वापरलं असतं तर बरं झालं असतं.’
आणखी वाचा- पल्लवी जोशी यांना पहिल्या भेटीत अजिबात आवडले नव्हते विवेक अग्निहोत्री, पण…
दरम्यान रितेश देशमुखचा ‘मिस्टर मम्मी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून त्याची पत्नी जिनिलिया डिसूझा देखील बऱ्याच काळानंतर अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार आहे. दोघंही बऱ्याच काळानंतर पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहे. हा एक विनोदी चित्रपट असून यात जिनिलिया आणि रितेश दोघंही गरोदर असल्याचं दाखवण्यात येणार आहे.