जगात भारत हा असा देश असेल जिथे सर्व धर्माचे लोक एकत्र आणि गुण्यागोविंदानं नांदत आहेत. प्रत्येक राज्याची बोली, त्यांच्या संस्कृती, श्रद्धा सारंच वेगळं आहे. पण तरीही विविधतेत असणारी एकता आजही आपण भारतीयांनी टिकवून ठेवली आहे. सर्वधर्मसमभाव मानणारा असा देश जगाच्या पाठीवर क्वचितच कुठे पाहायला मिळेल.
पण कधी कधी धर्माच्या नावाखाली अनेकजण या एकीत फुट पाडण्याचा प्रयत्न करतात. गुण्यागोविंदानं नांदण्याऐवजी आपण धर्माच्या नावाखाली केवळ एकमेकांच्या जीवावर उठतो. आपण सर्वधर्मसभाव मानणारे भारतीय आधी आहोत हे मात्र विसरतो.
Do watch (a whatsapp fwd) pic.twitter.com/3qYLR6JuJC
— Riteish Deshmukh (@Riteishd) September 23, 2018
त्यामुळे याचीच आठवण करून देण्यासाठी अभिनेता रितेश देशमुखनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हॉट्स अॅप फॉरवर्ड करण्यात आलेल्या हा व्हिडिओ रितेशनं ट्विटरवर शेअर केला आहे. धर्माच्या नावाखाली एकमेकांशी भांडणाऱ्या भारतीयांना गांधीजींनी एकतेची शिकवण या व्हिडिओमधून दिली आहे. आवर्जून पाहण्यासारखा हा व्हिडिओ तीन हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केला आहे.