बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रितेश सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत रितेश चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच रितेशने रॅपर बादशाहसोबत एक व्हिडीओ एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : २४ वर्षे बेपत्ता असलेल्या अभिनेत्याच्या पत्नीने केलं दुसरं लग्न, मुलगी करते आता हे काम
रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केली आहे. या व्हिडीओत बादशाह बोलतो मेरी कुंडली में लिखा है कि मुझे अपनी पत्नी से बहुत प्यार मिलेगा, लेकिन यह नहीं लिखा है कि मुझे किसकी पत्नी से मिलेगा। हे ऐकताच रितेश आश्चर्यचकित होऊन बादशाहकडे बघतो. हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत ‘प्यार तो पत्नी से ही मिलेगा’, असे कॅप्शन रितेशने दिले आहे.
आणखी वाचा : “नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा…”, वट पोर्णिमेच्या निमित्ताने हेमांगी कवीने शेअर केली खास पोस्ट
दरम्यान वेड या मराठी चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख हा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. २० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर आता रितेश या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही तब्बल १० वर्षांनी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. यासाठी तिने वेड या मराठी चित्रपटाची निवड केली आहे. या पूर्वी जिनिलियाने हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.