बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलिया देशमुखची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांचे लाखो चाहते आहेत. ते दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच रितेशने जिनिलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

रितेशने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेशने जेनेलियाच्या एका सवयीची टिंगल उडवली आहे. ती जेनेलियाची सवय म्हणजे वस्तू ठेवायच्या एकीकडे आणि शोधत बसायच्या दुसरीकडे आणि मग सगळ्या लोकांना त्या शोधण्यासाठी भाग पाडायचं. रितेशने तिला चिडवताना तिची अॅक्टिंग करून दाखवलीय. जेनेलिया नेहमी फोन पर्समध्ये सायलेंट मोडवर ठेवते आणि मग अख्ख घर शोधते. त्यानंतर घराची चावी हरवते तेव्हाही असंच होतं आणि ती सापडते तिच्या पर्समध्येच, पण त्यामुळे त्रास लोकांना होतो. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला प्रसिद्द स्टॅंडअप कॉमेडियन स्टीव्ह ट्रेव्हिनो यांचा नेमका ‘परफेक्ट वाईफ,नेव्हर मेक सिली मिस्टेक’ हा शो सुरू आहे. व्हिडीओत शेवटी जिनिलिया तोंड लपवताना दिसली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : “अशिक्षित आणि…”, सुधीर मुनगंटीवारांबाबत सोनम कपूरची पोस्ट व्हायरल!

आणखी वाचा : सिद्धार्थला एवढ्यात विसरलीस? साखरपुड्यातील शहनाजचा ‘सैराट’ डान्स पाहून आसिम रियाझ संतापला

रितेश आणि जिनेलियाने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. यंदाच्या वर्षी त्यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. जिनेलियाला खरी लोकप्रियता ही २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून मिळाली. जिनेलियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. मात्र, लग्नानंतर जिनेलियाने चित्रपटात काम केले नाही. त्यांना दोन मुलं असून रियान आणि राहिल अशी त्यांची नावं आहेत.

Story img Loader