अभिनेता रितेश देशमुख याने आपला सहा महिन्यांचा मुलगा रिआन याचे चुंबन घेतानाचे चित्र ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे. यात त्याची पन्ती जेनेलिया डिसूझा देखील दिसते. रितेशने पहिल्यांदाच आपल्या मुलाचे छायाचित्र प्रसिद्ध केले असून हे चित्र प्रसिद्ध करताना जेनेलियाला आपल्या ट्विटमध्ये टॅग करुन रिआनमुळेच आमचे वैवाहिक जीवन पुर्णत्वास गेल्याची भावना त्याने व्यक्त केली.

त्याचप्रमाणे रितेशने वडिल विलासराव देशमूख यांच्या ७०व्या जयंतीनिमीत्त पुष्पहार अर्पण करतानाचे छायाचित्रदेखील प्रसिद्ध केले आहे. यावेळी त्याची पत्नी जेनेलियासह सर्व कुटूंबिय उपस्थित होते.

Story img Loader