बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करत असल्याचे दिसत आहे. नुकतंच अभिनेता रितेश देशमुखने ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
रितेश देशमुखने नुकतंच ट्विटवरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने ‘द कश्मीर फाइल्स’हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याला काय वाटले? याबद्दल सांगितले आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबद्दल ट्वीट करताना रितेश म्हणाला, “अनेक विक्रम मोडत असलेल्या चित्रपटाचे कौतुक करण्याची हीच ती वेळ आहे. एक छोटा असा चित्रपट जो आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपटांपैकी एक बनण्याच्या मार्गावर आहे. अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन! तुमच्या टीमसाठी प्रचंड प्रेम आणि त्यांचे फार कौतुकही.”
‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.
दरम्यान १२ मार्च रोजी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी, चित्रटाचे निर्माते अभिषेक यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यावेळीही मोदींची चित्रपटाचं कौतुक केलं होतं. तसेच या चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. सध्या या चित्रपटाचे प्रचंड कौतुक केले जात आहे.