बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. रितेश आणि जिनिलिया हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. जिनिलियाने नुकताच हा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
जिनिलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ह व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला रितेश दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर डान्स करताना दिसतो. रितशेला श्रीवल्ली गाण्यावर डान्स करताना पाहून मध्येच जिनिलिया येते झलक दिखला जा या गाण्यावर नाचू लागते. त्यानंतर जिनिलियासोबत रितेशसुद्धा डान्स करू लागतो. हा व्हिडीओ शेअर करत “एक बार आजा आजा … aaaaaaaaaआजा”, असे कॅप्शन जिनिलियाने दिले आहे.
आई कुठे काय करते : मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट
रितेश आणि जिनेलियाने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. यंदाच्या वर्षी त्यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. जिनेलियाला खरी लोकप्रियता ही २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून मिळाली. जिनेलियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. मात्र, लग्नानंतर जिनेलियाने चित्रपटात काम केले नाही. त्यांना दोन मुलं असून रियान आणि राहिल अशी त्यांची नावं आहेत.
आणखी वाचा : युक्रेनच्या ‘या’ महिलेला घाबरत होते रशियाचे राष्ट्रपती पुतिन
‘पुष्पा : ज राइज’ चित्रपटाबद्दल बोलायचं तर हा चित्रपट लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित आहे. ज्यात अभिनेता अल्लू अर्जुननं ‘पुष्पा’ ही व्यक्तीरेखा साकारली आहे. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानाचीही मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट १७ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. एवढंच नाही तर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत तेवढीच क्रेझ पाहायला मिळत आहे.