बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रितेश सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. सणं सुरु होतात आणि या काळात लोकांना मिठाई खाण्यास आवडते. अशातच या वेळी रितेशने मिठाई खाल्यामुळे नुकसान होते आणि मिठाईची वाढलेली किंमत पाहता एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. मात्र, ही पोस्ट पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने त्याला ट्रोल केले आहे. त्यानंतर रितेशने त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

रितेशने ट्विटरवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रितेशने मिठाईच्या किंमती टाकल्या आहेत. मजेशीर म्हणजे सणांमध्ये मिठाईचे वाढते दर आणि दुसरीकडे त्यानंतर वजन कमी करण्यासाठी लागणारा खर्च लिहिला आहे. यात लाडू, जलेबी, काजू बर्फी आणि चॉकलेटचे भाव सांगितले आहेत. या लिस्टच्या शेवटी वजन कमी करण्यासाठी लागणारे पैसे. हे शेअर करत “डोक लावून निवडा, मला वाटलं तुम्हाला चेतावनी देऊ”, असे कॅप्शन रितेशने दिले आहे.

आणखी वाचा : जात लपवण्यासाठीच वडिलांनी स्वीकारलं ‘बच्चन’आडनाव, अमिताभ यांचा खुलासा

रितेशचे हे ट्वीट पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने त्याला ट्रोल केले आहे. “तुम्ही फक्त सनातनी सण असतात तेव्हा ज्ञान देता का? ईद किंवा ख्रिसमस किंवा नवीन वर्षाच्या दिवशी तुम्ही तोंडात दही गोळा करतात”, अशी कमेंट नेटकऱ्याने केली आहे. नेटकऱ्याच्या या प्रश्नावर रितेशने एक मजेशीर उत्तर दिले आहे. रितेशने लिहिले “सॉरी सर, मी विगन आहे, मी दही खात नाही.” रितेशने दिलेले हे उत्तर काही नेटकऱ्यांना आवडले आहे.

आणखी वाचा : ‘या’ कारणामुळे शाहरुख आजही विसरला नाही चंकी पांडेचे ‘ते’ उपकार

दरम्यान, रितेश आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख हे नेहमीच मजेशीर व्हिडीओ शेअर करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी अरबाज खानच्या ‘पिंच २’ या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी काही ट्रोलर्सला मजेशीर तर काहींना सडेतोड उत्तर दिले.

Story img Loader