आपल्या अभिनयाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केल्यावर आता रितेश देशमुख मराठी चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. याआधी रितेशने ‘बालक पालक’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. आता एक अभिनेता म्हणून तो ‘लई भारी’ या मराठी चित्रपटात दिसणार असून, तो या चित्रपटाचा सहनिर्मातादेखील आहे. या मनोरंजनपर अॅक्शनपटात रितेश मुख्य भूमिकेत आहे. रितेशने अभिनेता, सूत्रसंचालक, रियालिटी शोमधील जज आणि चित्रपट निर्माता अशा अनेक भूमिका बजावल्या असून, या हरहुन्नरी अभिनेत्याच्या मराठी चित्रटातील अभिनयाची मराठी प्रेक्षक वाट बघत आहेत. ‘लई भारी’ चित्रपटाद्वारे त्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे.
सिनेमंत्रा आणि मुंबई फिल्म कंपनी या संस्थाची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांचे आहे.
‘लई भारी’ मराठी चित्रपटात रितेश देशमुख
आपल्या अभिनयाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केल्यावर आता रितेश देशमुख मराठी चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. याआधी रितेशने 'बालक पालक' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती.
First published on: 09-07-2013 at 11:54 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमराठी चित्रपटMarathi Movieमराठी फिल्मMarathi Filmमराठी सिनेमाMarathi Cinemaहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 3 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukhs debut marathi film lai bhari goes on floors