आपल्या अभिनयाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केल्यावर आता रितेश देशमुख मराठी चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे.  याआधी रितेशने ‘बालक पालक’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. आता एक अभिनेता म्हणून तो ‘लई भारी’ या मराठी चित्रपटात दिसणार असून, तो या चित्रपटाचा सहनिर्मातादेखील आहे. या मनोरंजनपर अॅक्शनपटात रितेश मुख्य भूमिकेत आहे. रितेशने अभिनेता, सूत्रसंचालक, रियालिटी शोमधील जज आणि चित्रपट निर्माता अशा अनेक भूमिका बजावल्या असून, या हरहुन्नरी अभिनेत्याच्या मराठी चित्रटातील अभिनयाची मराठी प्रेक्षक वाट बघत आहेत. ‘लई भारी’ चित्रपटाद्वारे त्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे.
सिनेमंत्रा आणि मुंबई फिल्म कंपनी या संस्थाची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा