रितेश देशमुखची निर्मिती असलेला बहुचर्चित ‘यलो’ चित्रपट ४ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. ‘बालक पालक’ या सुपरहिट सिनेमानंतर प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर पुन्हा एकदा एका मराठी सिनेमाच्या निर्मितीसाठी एकत्र आले आहेत. मुंबई फिल्म कंपनी आणि विवा इन- एन या संस्थेमार्फत ‘यलो’ची निर्मिती करण्यात आली आहे.
फोटो गॅलरी: आगामी मराठी चित्रपटांवर दृष्टीक्षेप
‘यलो’ सिनेमाचे कथानक एका सत्य कथेवर आधारित असून नुकतेच मुंबई येथे या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण मुख्य अभिनेत्री गौरी गाडगीळ आणि तिच्या आई वडिलांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निर्माते रितेश देशमुख, उत्तुंग ठाकूर, दिग्दर्शक आणि सिनेमेटोग्राफर महेश लिमये, सिनेमातील कलाकार, तंत्रज्ञ मंडळी तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.


‘यलो’मध्ये उपेंद्र लिमये, मृणाल कुलकर्णी, ऋषीकेश जोशी, मनोज जोशी, ऎश्वर्या नारकर, उषा नाडकर्णी, शिखर हितेंद्र ठाकूर आणि प्रविण तरडे यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ४ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader