कलर्स वाहिनीवरून दाखविण्यात आलेल्या ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोसारखाच मराठी कलावंत, सेलिब्रिटींना घेऊन मराठी ‘बिग बॉस’ रिअ‍ॅलिटी शोची संकल्पना अभिनेता रितेश देशमुख व नीतेश राणे यांनी तयार केली आहे. त्यामुळे हिंदी ‘बिग बॉस’चे आलिशान घरही मराठी वाहिनीवर अवतरणार आहे. या नव्या मराठी रिअ‍ॅलिटी शोचे सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख करणार आहे हे नक्की आहे.
मराठी बिग बॉसद्वारे मराठी मनोरंजन उद्योगाला नवी झळाळी देण्याचा हेतू नीतेश राणे यांनी व्यक्त केला आहे. मात्र हिंदी बिग बॉस कार्यक्रमासारखा तो वादग्रस्त तसेच आक्षेपार्ह ठरणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले.  मराठीतले टीव्ही कलावंत , सिनेमातील कलावंत व अन्य सेलिब्रिटी, खेळाडू, राजकारणी बिग बॉसच्या घरातील सदस्य असू शकतील.  मराठी बिग बॉस कार्यक्रम कोणत्या वाहिनीवर दाखविणार हे सध्या निश्चित नाही. त्यामुळे बिग बॉसचे मराठी घर कसे असेल, घरांत कोण कोण सदस्य असतील याची चर्चा रंगायला बराच काळ  जाणार आहे.
संभाव्य सेलिब्रिटी – अनुष्का दांडेकर, पंढरीनाथ कांबळे, महेश मांजरेकर, सचिन आणि सुप्रिया पिळगावकर, अविनाश व ऐश्वर्या नारकर, अवधूत गुप्ते, भरत जाधव, भरत दाभोळकर, निर्मिती सावंत आदी.

Story img Loader