बॉलीवूडचा दबंग खान सलमानच्या आगामी ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाचा फर्स्टलूक किंग खान शाहरुखने प्रदर्शित केला आहे. बॉलीवूडच्या ‘खान’दानातील प्रतिस्पर्धा आता पूर्णपणे संपुष्टात आल्याचे हे द्योतक असल्याचे मानले जात आहे. शाहरुखने आपल्या ट्विटर अकाऊंटवर सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’च्या फर्स्टलूकचे ट्विटकरून नायक होण्यापेक्षा एखाद्याचा भाऊ (भाईजान) होण्यावर माझा जास्त विश्वास असल्याचे म्हटले आहे. शाहरुखच्या या ट्विटने सर्वांना अचंबित करून सोडले आहे. सलमानचा ‘बजरंगी भाईजान’ ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याची माहित देत पहिला पोस्टर कसा वाटला? असा प्रश्न देखील शाहरुखने आपल्या चाहत्यांना विचारला आहे. दोघांनीही एकमेकांच्या चित्रपटांची प्रसिद्धी करण्याच्या पुढाकारामुळे आता सर्वकाही आलबेल असल्याचे म्हटले जात आहे.

Story img Loader