भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा विभक्त होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहेत. धनश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन युजवेंद्रबरोबर फोटो काढून टाकल्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांनी जोर धरला होता. धनश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरून चहलबरोबरचे सर्व फोटो अर्काइव्ह केलेले होते. शिवाय तिने इन्स्टाग्रामवरुन ‘चहल’ हे आडनावही हटवले होते. त्यानंतरच त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा होती.
अशातच आता त्यांचा घटस्फोट होणार आहे. या दोघांनी ५ फेब्रुवारी रोजी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर गुरुवार म्हणजेच आज मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात निर्णय दिला जाणार आहे. त्यांच्या परस्पर संमतीने दाखल केलेल्या घटस्फोट अर्जावर गुरुवारीच निर्णय घेण्याचे आदेश न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठाने दिले. यादरम्यान आरजे माहवशने सोशल मीडियाद्वारे काही फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोखालील कॅप्शनमुळे तिने सर्वांचे लक्ष वेधलं आहे.
आरजे माहवशने तिचे काही फोटो शेअर करत “झुट, लालच, और फरेब से परे हैं, खुदा का शुक्र आईने आज भी खडे हैं” (आपण खोटेपणा, लोभ आणि कपटाच्या पलीकडे आहोत, देवाचे आभार मानते की आरसे अजूनही आहेत) असं म्हटलं आहे, तिची ही पोस्ट अवघ्या काही क्षणातच व्हायरल झाली असून या पोस्टला युजवेंद्रने लगेचच लाईकद्वारे पसंती दर्शवली. त्यामुळे आता नेटकरी यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. चहलने हे आधीच लाईक केलं आहे”, “आता आयपीएलमध्ये चहलचे जोरदार कमबॅक होणार अशा अनेक कमेंट्स या फोटोवर आल्या आहेत.
दरम्यान, आरजे माहवशने हे कॅप्शन पुन्हा दुरुस्त केल्याचे तिच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहे. मात्र तिने आधी लिहिलेल्या या कॅप्शनचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात युजवेंद्र व धनश्री यांच्या घटस्फोट व पोटगीच्या चर्चेदरम्यान तिने ही पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे तिच्या कॅप्शनची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
चहल आणि धनश्री यांच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर डिसेंबर २०२० मध्ये लग्न झाले होते. दोघे सोशल मीडियावर कायम सक्रीय असायचे. त्यानंतर जून २०२२ मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी संयुक्त अर्ज दाखल केला होता. त्यावर आज निर्णय दिला जाणार आहे.