‘झलक दिखला जा ६’ चा स्पर्धक आरजे मंत्रा शनिवारच्या भागात शोमधून बाद झाला आहे. वाइल्ड कार्ड इन्ट्रीद्वारे मंत्राने झलक दिखला जामध्ये प्रवेश केला होता. मंत्राने त्याच्या पहिल्या परफॉर्मन्सने माधुरी दीक्षित, करण जोहर आणि रेमो डिसोजा या परिक्षकांच्या मनावर छाप पाडली. मात्र, त्याच्या इतर परफॉर्मन्सने तो प्रेक्षकांचे मन जिंकण्यास अयशस्वी राहिला.
“मी फार लवकर शोमधून बाहेर पडत आहे. मला माझ्यातील कला दाखविण्याची संधीदेखील मिळाली नाही. नृत्य आणि संगीत माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. फक्त एका परफॉर्मन्सच्या आधारावर कोणीही माझ्या नृत्याचे परिक्षण करु शकत नाही,” असे मंत्रा म्हणाला.
मंत्राने ‘तुम मिले’, ‘गेम’ आणि ‘भेजा फ्राय २’ या चित्रपटांमध्ये काम केले असून त्याची मुख्य भूमिका असलेला ‘दिल पतंगे’ चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader