भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वाधिक काळ चालणारा साहसी रिअॅलिटी शो असलेला एमटीव्ही रोडीज आता आपले सोळावे पर्व सुरू करत आहे. रोडीज रिअल हिरोजची सुरूवात १० फेब्रुवारीपासून संध्याकाळी ७.०० वाजता एमटीव्हीवर होणार आहे. या नवीन सिझनमध्ये आता सर्व प्रेक्षकांना अनोखा अनुभव मिळणार आहे. रोडीज फेम रणविजय सिंघा पुन्हा एकदा सूत्रसंचालक आणि रिंग मास्टर म्हणून काम पाहणार असून त्यामुळे प्रत्येक स्तरावर नवीन ट्विस्ट आपल्याला पहायला मिळणार आहे. तर नेहा धुपिया, प्रिन्स नरूला, निखिल चिन्नप्पा आणि रफ्तार आपल्या टिम्सचे नेतृत्व करून १६ व्या पर्वांत आघाडी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. इतकेच नव्हे तर स्पर्धा अधिक बळकट करण्यासाठी भारतीय हॉकी टिमचा माजी कप्तान संदीप सिंग सुद्धा आपली एक टिम घेऊन रोडीज रियल हिरोजच्या माध्यमातून टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे.
या शोने भारतीय तरूणाईमध्ये असलेली साहसाची परिभाषा बदलली असून त्याचबरोबर धैर्य आणि साहसाने युक्त असलेल्या देशभरांतील रिअल लाईफ हिरोज असलेल्या स्पर्धकांना या सिझनमध्ये आकर्षित केले आहे.
सोळाव्या सिझनसाठी उत्साही असलेला रणविजय म्हणतो, ‘‘सर्वांत अधिक काळ चालणाऱ्या रिअॅलिटी शोचा भाग होताना आम्हाला आनंद होत आहे. मी या शोमध्ये एक स्पर्धक म्हणून सहभागी झालो, नंतर गॅंग लीडर आणि आता सलग दोन वर्ष मी मास्टर आहे म्हणजेच मला या सर्वांचा चांगला अनुभव आहे. या सिझनचा विषय पाहता मी अधिक उत्साही आहे कारण याधून मला देशभरांतील खऱ्या हिरोजच्या शक्तीचा अनुभव मिळेल व यांतील सर्वोत्कृष्ट जिंकेल.’’
अभिनेत्री नेहा धुपिया म्हणते, ‘‘रोडीज हा तरूणाईला एकत्र आणून त्यांच्यातील सर्वोत्कृष्ट बाहेर आणण्याचा एक सुंदर मंच आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर टिमवर्क, साहस, नाट्य आणि आनंद आहे. प्रत्येक सिझनमध्ये स्पर्धकांना अधिक चांगले मिळत असते. मीसुध्दा या सिझनने खूपच उत्साही आहे कारण संदीप सिंग आमच्या बरोबर येत असल्याने व रिअल हिरोज बरोबर मंच शेअर करत आहे. कारण या हिरोजनी त्यांच्या आयुष्यात नि:स्वार्थ आणि चांगले काम केले आहे.’’
रोडीज रिअल हिरोजची सुरूवात ही १० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७.०० वाजता एमटीव्हीवर होणार आहे.