Robert Downey Jr returns to Marvel : मार्व्हल सिनेमातील ‘आयर्नमॅन’ हे पात्र प्रचंड लोकप्रिय आहे आणि मार्व्हल फॅन्सच्या मनातील एक हळवा कोपरा आहे. जवळ जवळ ११ वर्षे ‘मार्व्हल’च्या विविध सिनेमांच्या भागात हे पात्र दिसले. २०१९ साली आलेल्या ‘अॅव्हेंजर्स: एंड गेम’ या सिनेमात या पात्राचा शेवट झाला आणि मार्व्हल सिनेमाचे चाहते अक्षरशः रडले. हॉलीवूड अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियरने आयर्नमॅन हे पात्र साकारले. हे पात्र आणि रॉबर्ट डाउनी ज्युनियर हे जणू समीकरणच झाले. २०१९ नंतर येणाऱ्या मार्व्हल सिनेमात चाहते आयर्नमॅनची भूमिका साकारणारा रॉबर्टला कॅमिओत तरी दिसेल किंवा टाईम ट्रॅव्हल, विविध युनिव्हर्स अशा कथेच्या मार्व्हल सिनेमात तरी तो असेल, या वेड्या आशेने सिनेमाला जात असत. मात्र, अजून तरी तो योग मार्व्हल सिनेमाच्या चाहत्यांसाठी जुळून आला नव्हता. पण हा योग आता येणार असून रॉबर्ट डाउनी ज्युनियर एमसीयू म्हणजेच मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये दिसणार आहे.
२००८ साली पहिल्यांदा रॉबर्ट डाउनी ज्युनियरने आयर्नमॅन हे पात्र साकारले. त्यानंतर ‘आयर्नमॅन २’, ‘आयर्नमॅन ३’, ‘द इनक्रेडिबल हल्क’, ‘द ॲव्हेंजर्स’, ‘कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर’, ‘ॲव्हेंजर्स: एज ऑफ अल्ट्रॉन’, ‘स्पायडरमॅन: होमकमिंग’, ‘ॲव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’ आणि ‘ॲव्हेंजर्स: एंड गेम’ यासह संपूर्ण फ्रेंचायझीमध्ये दहा चित्रपटांमध्ये तो दिसला. आता पुन्हा रॉबर्ट डाउनी मार्व्हल सिनेमात दिसणार आहे, मात्र आयर्नमॅन म्हणून नाही तर डॉक्टर डूम म्हणून. डॉक्टर डूम हे पात्र सुपरहिरो नसून सुपरव्हिलनच असणार आहे. रविवारी मार्व्हल सिनेमाने याची घोषणा केली. ‘ॲव्हेंजर्स: डूम्स डे’ या सिनेमात रॉबर्ट डाउनी डॉक्टर डूमचे पात्र साकारताना दिसणार आहे.
एक घोषणा आणि इंटरनेटवर पोस्टचा पाऊस
डॉक्टर डूम हे पात्र जर जगभर सिनेमागृहात आणायचे असेल तर ते जगातील बेस्ट अभिनेत्याने साकारावे, असे या सिनेमाच्या दिग्दर्शकाने म्हणताच क्षणी डॉक्टर डूमचे मास्क घातलेल्या अनेक लोकांमधून एक माणूस पुढे येतो. पुढे येऊन चेहऱ्यावरील मास्क वेगाने हटवतो आणि तिथे उपस्थित सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का बसतो. ‘सेम मास्क, न्यू टास्क’ असे म्हणत मला गुंतागुंतीच्या भूमिका करायला आवडतात असे रॉबर्ट म्हणतो. हा व्हिडीओ रविवारपासून वेगाने व्हायरल होतोय.
अनेक चाहते रॉबर्ट डाउनी मार्व्हल सिनेमात त्यांचा लाडका आरडीजे (रॉबर्ट डाउनी ) पुन्हा आल्याने खुश आहेत. ‘यू आयदर डाय अ हिरो ऑर लिव्ह लाँग इनफ टू सी युअरसेल्फ बिकम अ व्हिलन’ हा ‘डार्क नाईट’ सिनेमातील डायलॉग स्टेटसवर ठेवून चाहते या निर्णयाचे स्वागत करत आहेत. तुम्ही एकतर नायक होऊन मरता, किंवा स्वत:ला खलनायक बनताना पाहण्यासाठी तुम्ही दीर्घकाळ जगता. अशा आशयाचा हा डायलॉग आहे. रॉबर्ट डाउनीने आयर्नमॅन हे पात्र साकारताना ‘ॲव्हेंजर्स: एंड गेम’ सिनेमात जगाचे रक्षण करताना हिरो होऊन स्वतःचे बलिदान दिले आणि आता तो सुपरव्हिलन साकारणार आहे. म्हणजेच त्याने एका आयुष्यात सुपरहिरो आणि सुपरव्हिलन अशा दोन्ही भूमिका साकारल्या अशा आशयाचे व्हिडीओ स्टेटस चाहते सोशल मीडियावर ठेवत आहेत.
हेही वाचा…भाईजानने वाचवला होता लहान मुलीचा जीव! बोन मॅरो दान करत सलमान खान ठरला होता भारतातील पहिला दाता
काही चाहत्यांनी मात्र मार्व्हलच्या या निर्णयावर आपली नापसंती दर्शवली आहे. एका युजरने मार्व्हलच्या डॉक्ट डूम सिनेमाची घोषणा करणाऱ्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट केली आहे की “मी एकटाच असा आहे का ज्याला रॉबर्टला या भूमिकेत बघताना विचित्र वाटणार आहे? कारण रॉबर्ट डाउनी ज्युनिअर हा माझ्या डोक्यात टोनी स्टार्क (आयर्नमॅन) सुपरहिरो म्हणून इतका पक्का बसला आहे की माझ्यासाठी त्याला डॉ. डूमच्या भूमिकेत पाहणे कठीण असेल.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं “कदाचित हे नावडतं मत असेल पण मला या रोलसाठी सिलियन मर्फी योग्य निवड वाटतो.” कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांची असे शाब्दिक वाद सुरू असताना संपूर्ण इंटरनेट आरडीजेने (रॉबर्ट डाउनी ज्युनिअर) ब्रेक केले, म्हणजे केवळ त्याचीच चर्चा आहे अशा आशयाच्या पोस्ट चाहते आणि मीम पेज शेयर करत होते.
डॉक्टर डूम हे पात्र काय? हा सिनेमा कधी येणार?
डॉक्टर डूम हे ‘फँटॅस्टिक फोर’ मालिकेतील एक खलनायक पात्र आहे. स्टॅन ली आणि जॅक किर्बी यांनी १९६२ मध्ये पहिल्यांदा सादर केले होते. त्याच्या अलौकिक बुद्धिमत्तेसाठी, विज्ञान आणि जादूवर प्रभुत्व आणि अलौकिक सामर्थ्यासाठी ओळखले जाणारे, डॉक्टर डूम हे मार्व्हलच्या सर्वात भयंकर शत्रूंपैकी एक आहे, असे वृत्त ‘इ टाइम्स’ने दिले आहे. याच पात्रावर आधारित ‘ॲव्हेंजर्स: डूम्स डे’ हा सिनेमा २०२६ च्या मे महिन्यांत येणार आहे. या सिनेमात डॉक्टर डूमचे पात्र रॉबर्ट डाउनी ज्युनियर साकारणार असून या सिनेमाचे दिग्दर्शन रुसो ब्रदर्स (अँथनी रुसो, जो रुसो) करणार आहेत. त्यांनी याआधी ‘ॲव्हेंजर्स: एंड गेम’ आणि ‘ॲव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’ या मार्व्हलच्या रेकॉर्ड ब्रेक कमाई करणाऱ्या सिनेमांचे दिग्दर्शन केले होते.