बॉलीवूडमध्ये आयटम गर्ल म्हणून प्रसिद्धीस आलेली राखी सावंत ही नेहमी तिच्या अजब-गजब वक्तव्यांनी चर्चेत येते. पण, विचार करा जर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राखीची प्रशंसा केली तर तिचा आनंद गगनात मावणार नाही.
रजनीकांत यांनी आमंत्रितांच्या यादीतून सलमानला वगळले
‘रोबोट २.०’ या सिक्वलचा फर्स्ट लूक खुद्द रजनीकांत यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाला. हिंदी चित्रपट अभिनेता अक्षय कुमार या सिक्वलपटात पहिल्यांदाच खलनायक म्हणून रजनीकांत यांच्यासमोर उभा ठाकणार आहे. यावेळी, रजनीकांत यांनी असं काही केलं की तुम्हाला त्यावर विश्वास ठेवणं कठीण जाईल. पण, ही गोष्ट कळल्यावर राखी मात्र आनंदाने नाचू लागेल. रजनीकांत यांनी चक्क राखी सावंत ही बॉलीवूडची क्वीन असल्याचे म्हटले. बसला ना धक्का. पण, गोंधळू जाऊ नका. झालं असं की, चित्रपटाच्या फर्स्ट लूक लाँचवेळी रजनीकांत यांच्या उपस्थितीत रोबोट चिट्टी याने राखीला बॉलीवूडची क्वीन असे म्हटले. चिट्टी हा चित्रपटात रजनीकांत यांची रोबोटिक भूमिका साकारणारा रोबोट आहे.
तब्बल २० वर्षांनंतर रजनीकांतचा ‘तो’ चित्रपट होणार पुनर्प्रदर्शित
फर्स्ट लूक लाँचवेळी तंत्रज्ञानाच्या मदतीने रोबोटिक व्हर्जन असलेल्या चिट्टीसोबत करण जोहर याने रॅपिड फायर राउंड खेळला. यावेळी त्याने चिट्टीला बॉलीवूडचा किंग कोण? असा प्रश्न केला असता त्याने अमिताभ बच्चन यांचे नाव घेतले. नंतर बॉलीवूडची क्वीन कोण? या प्रश्नावर चिट्टीने करिना, कतरिना, ऐश्वर्या, प्रियांका, श्रीदेवी, अनुष्का अशी नावे घेण्यास सुरुवात केली आणि अखेर तो राखी सावंतवर येताच करणने त्याला थांबवले. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
रजनीकांत आणि अक्षय कुमारच्या बिग बजेट ‘२.०’ चित्रपटाचा फर्स्ट लूक
दरम्यान, २०१० साली आलेल्या ‘रोबोट’ या रजनीपटाच्या सिक्वलसाठी तब्बल साडेतीनशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून पूर्णत: थ्रीडी स्वरूपात याचे चित्रिकरण करण्यात येणार आहे. सिक्वलपटासाठी साडेतीनशे कोटी रुपये खर्च येणार असला तरी रजनीकांत यांच्या चित्रपटांना मिळणारे यश पाहता चित्रपटाचे निर्माते हेही शिवधनुष्य पेलायला तयार आहेत, अशी ग्वाही निर्मात्यांनीच दिली. या चित्रपटात हॉलीवुडपटांच्या दर्जाचे व्हीएफएक्स तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्यानेच खर्चाचा आकडा मोठा असल्याचे रजनीकांत यांनी स्पष्ट केले. ‘रोबोट’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाने तिकीटबारीवर कमाईचे विक्रम मोडले होते. ‘रोबोट २.०’बद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.