कष्ट आणि अविरत संगीत साधनेच्या बळावर नावलौकिक कमावणाऱ्या रॉक स्टार क्रिस कॉर्नेलच्या अकस्मित निधनाने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.मिक जॅगर, बोनो, ब्रूस, स्प्रिंगस्टीन, कॅथलीन हॅना आणि एल्विस प्रिस्ली यांनी रॉक संगीताची एक परंपरा निर्माण केली होती. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत क्रिसनेही यात उडी घेतली. माझे स्वर हीच माझी ओळख असे म्हणणाऱ्या या अवलियाने ‘स्पूनमॅन’ आणि ‘ब्लॅक होल सन’ या गाण्यांसाठी १९९५ साली ग्रॅमी पुरस्कारांवर आपले नाव कोरले. पारंपरिक संगीताच्या चौकटी भेदून विलक्षण प्रयोग करणारा हा ५२ वर्षीय संगीत साधक आता समाधीस्थ झाला आहे. त्याच्या मृत्यूचे निश्चित कारण अजूनही समजले नसल्याने आठवडाभर त्याच्या निधनाची बातमी लपवून ठेवण्यात आली होती. क्रिसची हत्या झाली असावी असा पोलिसांचा संशय आहे. त्याचा मृत्यू चाहत्यांना चटका लावणारा ठरला आहे. कल्लेदार केस, रंगीबेरंगी कपडे, हातात गिटार आणि कंठात मंत्रमुग्ध करणारे स्वर अशा ऐटबाज क्रिसचा ‘युफोरिया मॉर्निग’ हा पहिला म्युझिक अल्बम १९९९ साली प्रकाशित झाला. त्यानंतर ‘कॅरी ऑन’, ‘सॉंग बुक’, ‘मशीनगन प्रेशर’, ‘हायर ट्रथ’, ‘स्क्रीम’ या त्याच्या अल्बम्सनी अमाप लोकप्रियता मिळवली. ‘द साउंड गार्डन’ नावाचा त्याचा म्युझिक बँडही जगभरात लोकप्रिय होता. १९९७ साली क्रिसने शारीरिक प्रकृती खालावल्यामुळे काम करणे बंद केले होते. पण चाहत्यांच्या आग्रहाखातर २००३ साली ‘लाइक अ स्टोन’ या गाण्यातून त्याने पुनरागमन केले. जेम्स बॉण्डपट ‘कॅसिनो रॉयल’मधील त्याचे ‘यू नो माय नेम’ हे गाणे प्रचंड गाजले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा